डोनाल्ड ट्रम्प'साठी १२० कोटी खर्च आणि कोरोना लढ्यासाठी फक्त टाळ्या आणि थाळी
नवी दिल्ली, २१ मार्च: कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत सरकारने आपली रणनीती बदलली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. भारतात २७१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आता सरकारने सर्व रुग्णालयाच न्यूमोनियाच्या रुग्णांचीही तपासणी केली जाणार आहे. यासाठी सर्व राज्यांना आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी, न्यूमोनिया झालेल्या सर्व रुग्णांना एनसीडीसी किंवा आयडीएसपीला कळवावे, जेणेकरुन त्यांच्या COVID-19 ची तपासणी करता येईल, असे सर्व रुग्णालयांना सांगितले आहे.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी उद्या, रविवारी देशातील नागरिकांना जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला देशातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. शासकीय आणि खासगी कंपन्यांनी रविवारी जनता संचारबंदीनिमित्त आपले कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी लोकांनी अजिबात घराबाहेर पडू नये. आपापल्या घरातच राहावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दरम्यान, मोदींच्या या आवाहनावर अभिनेत्री नगमा हिने टीका केली आहे. नगमा हिने ट्विट करुन म्हटलंय की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी १२० कोटी रुपये खर्च केले पण कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी फक्त टाळी आणि थाळी, एक ह्दय किती वेळा जिंकणार मोदीजी? असा खोचक सवाल करत मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
डोनाल्ड ट्रंप केे लिए 120 करोड़ का खर्चा
और
कोरोना वायरस के लिए सिर्फ़ ताली और थाली 🍽
1 दिल को कितनी बार जीतोगे मोदी जी 😷😷— Nagma (@nagma_morarji) March 20, 2020
News English Summery: Prime Minister Narendra Modi has urged the citizens of the country to observe the Janata Curfew (Janata Curfew) on Sunday to prevent the transmission of corona virus. Citizens of the country have begun to respond well to this call. Government and private companies on Sunday decided to keep their operations completely closed for public communication. People should never go out of the house these days. Narendra Modi has appealed that he should stay in his own house. Meanwhile, actress Nagma has criticized Modi’s appeal. Nguma tweeted, saying that he spent US $ 120 million for US President Donald Trump, but how many times will Modiji win only a plate and a platter to prevent the spread of the Corona virus? Modi has been criticized for making such ridiculous questions.
News English Title: Story Corona Virus congress leader and Bollywood actress Nagma raises question over PM Modi speech corona issue News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट