19 July 2019 9:45 AM
अँप डाउनलोड

विधानसभा तयारी: वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद मुंबई भाजपच्या बैठकीत?

विधानसभा तयारी: वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद मुंबई भाजपच्या बैठकीत?

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या नैतृवत्वाखाली स्थापन झालेली वंचित बहुजन आघाडीवर विरोधकांनी नेहमीच भाजपची बी टीम असा आरोप केला आहे. तसेच वंचित आघाडीचा उद्देश हा लोकसभा निवडणूक जिंकणं नव्हता तर भाजपाला अप्रत्यक्ष मदत करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करणं आहे, असा खुलेआम आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला होता.

दरम्यान सध्या राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत आणि सर्वच पक्षांच्या अंतर्गत बैठका सुरु झाल्या आहेत. मात्र त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वंचित आघाडी विरुद्धच्या दाव्याची पुष्टी करणारी घटना घडल्याने समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मुंबईमध्ये भाजपाची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती आणि याच भाजपच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अस्लम सय्यद देखील उपस्थित राहिल्याने अनेकांनी विरोधकांच्या डाव खरा असल्याचं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज खासदार पराभूत झाले आणि त्यात वंचित आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेली मत निर्णायक ठरली होती. त्यातीलच एक पराभव म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टींचा झालेला पराभव. मात्र त्याच मतदारसंघात त्यावेळी वंचित आघाडीने अस्लम सय्यद यांना यूएमद्वारी दिली होती. या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आयात उमेदवार धैर्यशील माने यांना एकूण ५,८५,७७६ मत पडली होती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना एकूण ४,८९,७३७ मत पडली होती. तर वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांना तब्बल १,२३,४१९ मत पडली होती आणि हीच मत राजू शेट्टी यांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती. दरम्यान याच राजू शेट्टी यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध १,७७,८१० मतांची आघाडी घेतली होती.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(48)#Raju Shetty(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या