30 November 2022 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार? Horoscope Today | 30 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा Gold Price Today | आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासून घ्या SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत (मुंबई) भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

अनलॉक सुरु झाला | मुंबईकर सुद्धा सुटले | रस्त्यावर तुफान ट्राफिक, अन गल्लोगल्ली लोकांची गर्दी

Maharashtra UnLock

मुंबई, ०७ जून | कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. आता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करायला सुरुवात केली आहे. त्यासोबतच कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. सोमवारी मुंबई अनलॉक होताच मुंबईकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसले. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. यामुळे मुंबईतील इस्टर्न व वेस्टर्न एक्सप्रेस वे वर वाहनांच्या मोठ्याप्रमाणावर रांगा पहायला मिळाल्या.

कार्यालयात दाण्यासाठी लोक BEST बस स्टॉपवर रांगांमध्ये उभे असलेले दिसले. सध्या बसमध्ये जेवढे सीट आहेत तेवढेच लोक एका वेळी प्रवास करु शकतात. कोणालाही उभे राहुन जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ठाण्यातून मुंबईला येणाऱ्या गाड्यांच्या संख्येत आज मोठी वाढ पाहायला मिळाली. ज्यामुळे मुलुंड चेक नाक्याजवळ लांब जाम होता. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेच्या आधारावर मुंबईला कॅटेगिरी-3 मध्ये ठेवण्यात आले आहे.

मुंबई लोकलमध्ये गर्दी कंट्रोल करण्यासाठी रेल्वेने सोमवारी विशेष ड्राइव्ह सुरू केली आहे. जेणेकरुन केवळ आवश्यक सेवांसंबंधीत लोकांनाच प्रवास करता येईल. मात्र अनलॉकच्या पहिल्या दिवसासारखी परिस्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळाली. ज्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो.

 

News English Summary: The state government had imposed strict restrictions in the state for the last one and a half months in the wake of the growing Corona epidemic. Now the state government has started unlocking the whole of Maharashtra. It also warned of stern action against those violating the Corona rules. As soon as Mumbai was unlocked on Monday, Mumbaikars were seen crowding the streets. As a result, there were long queues of vehicles at important intersections in Mumbai.

News English Title: Mumbai huge traffic jam after unlock process to city news updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x