15 December 2024 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

उ. कोरियात पहिला रुग्ण सापडताच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

Kim Jong, North Korea, Corona Virus, Covid 19

सिओल, २६ जुलै : जगभरातील कोरोना संकटाला कारणीभूत ठरलेल्या चीनचा जिगरी दोस्त मानल्या जाणाऱ्या उत्तर कोरियालाही आता कोरोनाचा झटका बसला आहे. उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण आढळल्याचे कळताच या देशाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी थेट देशभरात राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. तसेच किम यांनी स्वतःच्या देशात पहिल्यांदाच मास्कच्या सक्तीचे फर्मान काढले असून मास्क न घालणाऱ्यास दंड नव्हे तर थेट सक्त मजुरीची शिक्षा देण्याचे फर्मान काढले आहे.

उत्तर कोरियात आढळलेला कोरोना संशयित रुग्ण दक्षिण कोरियातून बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून उत्तर कोरियात आला आहे. या व्यक्तीला तीन वर्षांपूर्वी देशद्रोही ठरवून देश सोडण्यास भाग पाडले होते. या घटनेनंतर आमच्या उत्तर कोरिया देशात जीवघेणा कोरोना व्हायरस पसरविण्याचा हा प्रयत्न करण्यात आला असल्याचा संशय उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे उत्तर कोरिया इतर देशांप्रमाणे फक्त फर्मान काढून मोकळा झाला आहे असेही नाही. तर लोक प्रत्यक्षात मास्क घालत आहेत की नाही, यावर नजर ठेवण्यासाठीच स्वतंत्र तुकड्या नियुक्त केल्या आहेत. या तुकड्यांना वेगवेगळ्या शहरात गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांवर नजर ठेवण्याचे काम दिले आहे.

उत्तर कोरिया सातत्याने सर्व देशांना, आमच्या देशात एकही कोरोना रुग्ण नाही असे ठणकावून सांगत होता. मात्र उत्तर कोरियाच्या या दाव्यावर तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, काही वर्षापूर्वी दक्षिण कोरियामध्ये पळून गेलेल्या आणि गेल्या आठवड्यात बेकायदेशीरपणे उत्तर कोरियाच्या सीमेमध्ये घुसलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. केसीएनएच्या मते, श्वसन आणि रक्त तपासणीतून असे दिसून आले की त्या व्यक्तीला विषाणूद्वारे “संसर्ग झाल्याचा संशय आहे”. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर कोरियाने कोरोनामुक्त देशासाठी सर्व सीमा बंद केल्या होत्या.

 

News English Summary: Corona first suspected patient has been found in North Korea. The country’s dictator, Kim Jong Un, has declared a state of emergency across the country. Also, for the first time in his country, Kim has issued a mandatory ban on masks.

News English Title: North Korean suspected first corona patient authorities impose a lockdown on the border city of Kaesong News Latest Updates.

हॅशटॅग्स

#North Korea(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x