27 July 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

खासदार संजय राऊत काय ऐकत नाहीत; सकाळ होताच भाजपाची 'शायराना' खिल्ली

Shivsena, BJP, MP Sanjay Raut, BJP Maharashtra

मुंबई: मागील काही दिवसांपासून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत सतत भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत आहेत. समाज माध्यमांवर, सामनातील अग्रलेख, पत्रकार परिषदा यांच्या माध्यमातून राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. आज त्यांनी कवी दुष्यंत कुमार यांचा एक शेर ट्विट केला आहे. ‘तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं,’ असा शेर राऊत यांनी ट्विट केला आहे. यामधून त्यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केल्याची चर्चा आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कोअर समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही दोन्ही पक्षांमधील हा तिढा कसा सोडवायचा याबाबत चर्चा झाली. त्यातही दोन पावले मागे येण्यातच सर्वांचे हित असल्याची भूमिका अनेक ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचे समजते. दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांची आज, गुरुवारी बैठक बोलावण्यात आली असून, यामध्ये विचारमंथन करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख या बैठकीस उपस्थित राहणार असल्याने त्यास राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता अतिशय महत्त्व निर्माण झाले आहे. या बैठकीत भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पर्यायांची चाचपणी होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवायचे, की भाजपसोबतच सरकार बनवायचे याबाबत निश्चित निर्णय घेण्यासाठी पक्षाच्या आमदारांचा कल शिवसेना नेतृत्व जाणून घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक आमदारांच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचं बोललं जात आहे. शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता सध्याची विधानसभा विजर्सित होईल. त्याअगोदर सत्ता स्थापनेचा दावा करून मंत्रिपदाची शपथ घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आज दिवसभरात अनेक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x