29 March 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

राज ठाकरेच बाळासाहेबांचे विचार पुढं घेऊन जाऊ शकतात: आ. नितेश राणे

BJP MLA Nitesh Rane, Shivsena, Hindutva, MNS Chief Raj Thackeray

मुंबई: ‘राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलेली नवी भूमिका ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना साजेशी अशीच आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्यांना समाधान देणारी आहे. राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे विचार पुढं घेऊन जाऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय,’ अशी सूचक प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.

“बाळासाहेब ठाकरेंची जयंती असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यापैकी कुणीही अभिवादन केलं नाही. या गोष्टी शिवसेना, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का ? अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे. “संजय राऊत काही बोलले तर दिल्लीवरुन फोन येतो आणि ते शब्द मागे घेतात,” असंही यावेळी ते म्हणाले.

माझं अंतरंग भगवं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात. मात्र केवळ बोलून अंतरंग होत नसतं, असा टोला त्यांनी लगावला. काल बाळासाहेब ठाकरेंची जयंती होती. त्या निमित्तानं गांधी घराण्यातल्या एका व्यक्तीनं तरी बाळासाहेबांना अभिवादन केलं का, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. शिवसेनेचा कारभार दिल्लीच्या इशाऱ्यावर सुरू आहे. संजय राऊत तर सकाळी केलेली विधानं संध्याकाळी मागे घेत आहेत, असंदेखील ते पुढे म्हणाले.

 

Web Title:  BJP MLA Nitesh Rane welcomes Hindutva stand of MNS Chief Raj Thackeray slams Shivsena.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x