23 September 2021 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

चिपी विमानतळ उद्घाटन | मुख्यमंत्री आले तर स्वागत करू - नारायण राणे

Narayan Rane

मुंबई, १० सप्टेंबर | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आले तर स्वागत करू असा पवित्र घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान केल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी नरमाईचा सूर आळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर स्वागत करू, असं नारायण राणे म्हणाले. राणेंनी अवघ्या तीनच दिवसात पलटी खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

चिपी विमानतळ उद्घाटन, मुख्यमंत्री आले तर स्वागत करू – We will welcome CM Uddhav Thackeray during Chipi Airport inauguration said Union minister Narayan Rane :

विकासाची प्रत्येक गोष्ट माझं स्वप्नच आहे. सिंधुदुर्गात विमानतळ मी स्वत: बांधलं आहे. मी मंत्री असताना बांधून पूर्ण केलं आहे. हे विमानतळ 9 ऑक्टोबरला सुरू होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. श्रेय कसलं? जे कोण बोलतंय त्यांचं सिंधुदुर्गाच्या विकासात एक टक्क्याचं श्रेय नाही. काही नाही. विमानतळ बांधून मी पूर्ण केलंय. श्रेयाचा प्रश्न येतो कुठे, असं सांगतानाच मुख्यमंत्री आले तर त्यांचं स्वागत करू, असं राणे म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी गणरायाकडे राज्याच्या सुखसमुद्धीचे साकडे घातले. गणरायाने आतापर्यंत राणे कुटुंबीयांना सुखी समाधानी ठेवलं आहे. मात्र, गणरायाकडे एक प्रार्थना करेन की. महाराष्ट्रावर कोणतंच संकट येऊ देऊ नको. कोरोनाचं संकट दूर होऊ दे. जनतेला सुखी समाधानी ठेवावं, असं राणे म्हणाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: We will welcome CM Uddhav Thackeray during Chipi Airport inauguration said Union minister Narayan Rane.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x