त्यांनी १ वर्ष फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे विकली - राम शिंदे

कर्जत-जामखेड, २४ ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महा विकास आघाडीचे सरकारला एक वर्ष पूर्ण झाली. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली. अशी गंभीर टीका भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी राम शिंदे बोलत असतांना त्यांनी रोहित पवार यांचावर खोचक टीका केली आहे. `बारामती पॅटर्न राबवू,` याबाबत जनतेची घोर निराशा झाली असून, कर्जतमधील विकासाची घोडदौड थांबली आहे. वर्षभराचा लेखाजोखा पाहता कर्जत- जामखेडमधील विकासाचे नवे पर्व अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका राम शिंदे यांनी केली.
“मी केलेल्या कामांचं भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते झालं असताना ते पुन्हा भूमिपूजन करत आहेत. तुकाई उपसा सिंचन योजनेसह अनेक कामं बंद पाडली,” अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केला. “बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरला असुन लोकांची घोर निराशा झाली आहे,”असंही ते म्हणाले. नवीन पर्व असं काही नसून सगळं खोटं असल्याची टीकाही त्यांनी केली.
राम शिंदे यांनी यावेळी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, “७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु असून याप्रकरणी खडसे विरोधी पक्षनेते असताना प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे”.
News English Summary: One year has passed since the Maha Vikas Aghadi government took a turn in the politics of Maharashtra. However, NCP MP from Karjat-Jamkhed constituency Rohit Pawar sold only chickens, fish and seeds in one year. BJP vice president Ram Shinde has made such a serious criticism.
News English Title: BJP Ex MLA Ram Shinde criticized NCP MLA Rohit Pawar News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Stock Market Crash | शेअर बाजार धडाम | सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला | निफ्टी 15809 वर बंद
-
Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 5 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी