15 October 2019 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
#VIDEO: सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि मनसेचं हे योगदान चंद्रकांत पाटलांचे डोळे उघडेल? सविस्तर भाजपच्या प्रचार पोवाड्यात महाराजांचा पुतळा राष्ट्रवादीने उभारलेला अन मेट्रो काँग्रेसच्या काळातील तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण: ओलिवबोर्डच सर्वेक्षण नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन VIDEO: राज ठाकरेंचा दावा सत्य! टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलेलं; त्याचा हा पुरावा आदित्य ठाकरेंचं 'केम छो' नंतर 'अय्यो लुंगी', मतांसाठी 'लुंगी हटाव' नाही तर 'लुंगी पहनों' धक्का! नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली
x

आशा बुचकेंची शिवसेनेतून हकालपट्टी, आमदार शरद सोनावणेंच्या विरोधात रणशिंग फुंकणार?

Shivsena

पुणे : पुणे जिल्हा शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेडपी सदस्य आशा बुचके यांची शिवसेनेने पक्षातून अधिकृतपणे हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका बुचके यांच्यावर ठेवण्यात आला आहे, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख (शिरूर लोकसभा) राम गावडे यांनाही पदावरून दूर करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईची बडगा शिवसेनेकडून उगारण्यात आला आहे, पुणे शहरातील दोन्ही शहर प्रमुखांना पदावरून हटवण्यात आले आहे, आता बुचके आणि गावडे यांना देखील पक्षातून काढण्यात आलं आहे. आशा बुचके या २००२ पासून जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांनी आणि २०१४ मध्ये पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसेकडून विजयी झालेले जुन्नरचे आ. शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, सोनवणे यांच्या प्रवेशाला बुचके यांच्याकडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीत पक्षात ग’टबाजी पहायला मिळाली, आयचा पक्षाला सर्वाधिक फटका जुन्नरमध्ये बसला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना ४६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. दरम्यान आशा बुचके देखील विद्यमान जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनावणे यांच्या विरोध विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(615)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या