22 September 2019 2:01 PM
अँप डाउनलोड

ED आणि CBI तपास यंत्रणा आहेत की मोदी-शाहांचे कार्यकर्ते? : राजू शेट्टी

Raju Shetty, MNS, Raj Thackeray, PM Narendra Modi, ED Notice, CBI Notice

मुंबई : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी आणि गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CBI या तपास यंत्रणा आहेत की मोदी शाहांचे कार्यकर्ते आहेत? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसवरुन राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

सरकारविरोधात गेलं की अशा यंत्रणा मागे लागतातच. 20-22 वर्षापूर्वीचा व्यवहार आहे, मग इतक्या दिवस ईडी झोपली होती का? आम्ही कोणत्याही गैरव्यवहाराचं समर्थन करत नाही, पण राजकीय सूडापोटी कारवाई होते हे स्पष्ट आहे, अशी प्रतिक्रिया देत माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Raju Shetty(20)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या