22 September 2019 2:12 PM
अँप डाउनलोड

ईडीच्या नोटीसमध्ये 'भेटायला या' एवढाच उल्लेख आहे : उन्मेष जोशी

Manohar Joshi, Shivsena Leader Manohar Joshi, Former CM Manohar Joshi, Kohinoor, ED

मुंबई : कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर आहेत. तुमच्या विरोधात बोलेल, तुमची प्रकरणं बाहेर काढेल, तुमचा खोटारडेपणा बाहेर काढेल त्याच्यावरुद्ध दाबावतंत्राचा वापर करायची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. सीबीआय असेल किंवा ईडी असेल या आता स्वायत्त संस्था राहिलेल्या नाहीत तर त्या भाजपाच्या कार्यकर्त्या झालेल्या आहेत. दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी यांना देखील ईडीने नोटीस बजावली आहे. उन्मेष जोशींना आज तर राज ठाकरे यांनी येत्या गुरुवारी म्हणजे २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उन्मेष जोशी हे ईडीच्या कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रया दिली. उन्मेष जोशी म्हणाले, “ईडीची नोटीस मला आली आहे. या नोटीसमध्ये नेमका कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. मी उद्योगपती आहे. कोहिनूर मिल व्यवहार बद्दल विचारत आहात ते १० वर्षापूर्वीचं प्रकरण आहे.”

“नोटीसमध्ये कोणतेही आरोप नाहीत, ईडीने केवळ भेटायला बोलावलं आहे. काय प्रश्न आहे ते बघून उत्तरं देऊ. नोटीसमध्ये कोणाकोणाची नावं आहेत हे माहित नाही, ईडीला माहित असेल. भेटायला बोलावलं आहे, काय आहे ते बघू. नोटीसमध्ये राज ठाकरे आणि माझं नाव आहे हे फक्त वर्तमानपत्रामध्ये कळलं, नोटीसमध्ये नावं नाहीत”, असंही उन्मेष जोशी म्हणाले.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Shivsena(571)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या