13 December 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल
x

लोकसभेत लष्कराच्या नावाने मतं; आता विधानसभेत वैज्ञानिकांच्या नावाने मतं मागितली जाणार

Chandrayan 2, ISRO, BJP Maharashtra, Assembly Election 2019

पुणे: २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने समाज माध्यमांचा मोठ्याप्रमाणावर वापर केला होता. सोशल मिडीयावर केलेल्या प्रचाराचा फायदा घेत घवघवीत यश मिळाले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडनुकीसाठी सुद्धा भाजपची वॉर रूम सज्ज झाली असून समाज माध्यमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दरम्यान, कोणत्याही मोठ्या निवडणुकीच्या वेळी भाजप आणि भावनिक मुद्दा तसेच त्यासंबंधित कन्टेन्ट तयार करते. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत लष्कराचा भावनिक मुद्दा पुढे करून मतं मागितली तशीच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय वैज्ञानिकांच्या नावाने मतं मागितली जाणार हे निश्चित पुण्यात निश्चित झालं आहे.

पिणे शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मिडिया टीम पोहोचणार असून आठही मतदारसंघांसाठी हि टीम एकत्र काम करणार आहे. अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली आहे..पक्ष्याच्या शहरातील मुख्यालयातून या वॉर रूमचे काम चालणार आहे. तसेच ही वॉर रूम प्रदेश आणि केंद्रीय वॉर रूमला संलग्न असणार आहे. सुमारे १०० युकांची टीम सोशल मिडीयाच काम करणार आहेत. तिहेरी तलाक रद्द करणे, कलम ३७० रद्द करणे, चांद्रयान, मेट्रो, पीएमआरडीचा विकास आराखडा, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण, नव्या ई-बस, झोपडपट्टी पुनर्विकास आदींबाबत घेतलेल्या प्रमुख निर्णयांचीही माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

दरम्यान जानेवारी महिन्यात महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल प्रमुख आशिष मरखेड हा प्रसार माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या बनवून ते समाज माध्यमांवर पसरवताना पकडला गेला होता. विशेष एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या ८ जानेवारीच्या राहुल गांधी याच्या मूळ बातमी मध्ये धार्मिक बदल करून ती स्वतःच्या अधिकृत ट्विटरवरून प्रसिद्ध करताना पकडला गेला होता.

वास्तविक राहुल गांधी यांच्या मुलाखती विषयीची एक ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध करण्यात करण्यात आली होती. मात्र एबीपी न्यूजच्या त्या मूळ फ्लॅश न्यूजच्या स्क्रीनशॉटमध्ये फोटोशॉप करून त्यात राहुल गांधी जे बोलले नव्हते ते मुस्लिमांशी संबंधित वाक्य बनवून त्याला स्वतःच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केलं होतं.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x