राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ११वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
पुणे, १५ जुलै : CBSE बोर्डानं आज बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.
दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीचे निकाल रखडले असले, तरी अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारुप Mock.Demo.Registration या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी आणि पालकांना अचूकपणे अर्ज भरण्यास मदत होणार आहे. या अर्जात भरलेली माहिती २४ जुलैनंतर नष्ट करण्यात येईल. केवळ सरावासाठी 16 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालेल. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी याबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश दिले आहेत.
News English Summary: The State Department of Secondary and Higher Secondary Education has announced a revised schedule for the eleventh admission. As per the revised schedule, from July 26, students will be provided the facility to apply for registration and fill up part one of the application.
News English Title: Maharashtra State HSC Board declared schedule for 11th standard admission News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN