14 December 2024 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

गोस्वामी आणि अन्वय नाईक यांच्यातील संभाषणाचे पुरावे पोलिसांकडे | १९१४ पानांचे आराेपपत्र कोर्टात

Charge sheet filed, Alibag court, Arnab Goswami, Anvay Naik suicide case

मुंबई, ६ डिसेंबर: सर्वोच्य न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी दोषमुक्त झाल्याप्रमाणे देखावा केला होता. मात्र त्यांच्या अडचणीत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रायगड पोलिसांनी देखील पुराव्यानिशी आरोपपत्र नायालयात दाखल केलं आहे. मात्र त्यानंतर अर्णब गोस्वामी देखील पुन्हा सतर्क झाले असून त्यांनी देखील आधीच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रसार माध्यमांकडे आलेल्या वृत्तानुसार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात विनंती अर्ज दाखल केला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग न्यायलयात १९१४ पानी आरोपपात्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात रायगड पोलिसांनी एकूण ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामी यांनी कोर्टात धाव घेतली असून आरोपपत्राची दखल घेऊ नये, असे निर्देश अलिबाग कोर्टाला द्यावेत, अशी हायकोर्टाला अर्जाद्वारे विनंती केली आहे.

रायगड पाेलिसांनी सुमारे १,९१४ पानांचे दाेषाराेपपत्र अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात शुक्रवारी दाखल केले हाेते. अन्वय नाईक यांनी गाेस्वामी, सारडा आणि शेख या आराेपींचे वास्तुसजावटीचे काम केले हाेते आणि केलेल्या कामाची रक्कम आराेपींनी नाईक यांना दिली नाही.

नाईक यांना आत्महत्या करण्यास आराेपींनीच प्रवृत्त केल्याचे दाेषाराेपपत्रात पाेलिसांनी नमूद केले आहे, असेही ॲड. साळवी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गाेस्वामी, सारडा आणि शेख यांच्या विराेधातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निर्णय जिल्हा सत्र न्यायालय आज देण्याची शक्यता हाेती. मात्र, न्यायालयाने आता १९ डिसेंबरची तारीख दिली आहे.

रायगड पाेलिसांनी न्यायालयात १९१४ पानांचे आराेपपत्र शुक्रवारी दाखल केले. अन्वय नाईक यांनी वास्तुसजावटीचे काम उप ठेकेदाराला दिले हाेते. त्यामुळे जाेपर्यंत अर्णब यांच्याकडून पैशाची वसुली हाेत नाही ताेपर्यंत नाईक उपठेकेदाराला पैसे देऊ शकत नव्हते. अर्णब गोस्वामी आणि अन्वय नाईक यांच्यातील संभाषण झाल्याचा पुरावा पाेलिसांकडे आहे. त्याचप्रमाणे बॅंक खात्यांच्या विवरणावरुनही काही गाेष्टी स्पष्ट हाेत असल्याचे पाेलिसांनी दाेषाराेपपत्रात नमुद केले आहे.

 

News English Summary: According to the Naik suicide case, Raigad police has filed a 1914-page charge sheet in Alibag court. In this charge sheet, Raigad police has recorded the answers of 65 witnesses. Arnab Goswami has moved the court against the charge sheet and has directed the Alibag court not to take cognizance of the charge sheet.

News English Title: Charge sheet filed in court against Arnab Goswami regarding Anvay Naik suicide case news updates.

हॅशटॅग्स

#crime(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x