राऊतांकडून पुन्हा अर्णब गोस्वामी लक्ष | अन्वय नाईक आत्महत्या आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा काय संबंध?
मुंबई, ६ डिसेंबर: सर्वोच्य न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी दोषमुक्त झाल्याप्रमाणे देखावा केला होता. मात्र त्यांच्या अडचणीत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रायगड पोलिसांनी देखील पुराव्यानिशी आरोपपत्र नायालयात दाखल केलं आहे. मात्र त्यानंतर अर्णब गोस्वामी देखील पुन्हा सतर्क झाले असून त्यांनी देखील आधीच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
रायगड पाेलिसांनी सुमारे १,९१४ पानांचे दाेषाराेपपत्र अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात शुक्रवारी दाखल केले हाेते. अन्वय नाईक यांनी गाेस्वामी, सारडा आणि शेख या आराेपींचे वास्तुसजावटीचे काम केले हाेते आणि केलेल्या कामाची रक्कम आराेपींनी नाईक यांना दिली नाही. नाईक यांना आत्महत्या करण्यास आराेपींनीच प्रवृत्त केल्याचे दाेषाराेपपत्रात पाेलिसांनी नमूद केले आहे, असेही ॲड. साळवी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गाेस्वामी, सारडा आणि शेख यांच्या विराेधातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निर्णय जिल्हा सत्र न्यायालय आज देण्याची शक्यता हाेती. मात्र, न्यायालयाने आता १९ डिसेंबरची तारीख दिली आहे.
रायगड पाेलिसांनी न्यायालयात १९१४ पानांचे आराेपपत्र शुक्रवारी दाखल केले. अन्वय नाईक यांनी वास्तुसजावटीचे काम उप ठेकेदाराला दिले हाेते. त्यामुळे जाेपर्यंत अर्णब यांच्याकडून पैशाची वसुली हाेत नाही ताेपर्यंत नाईक उपठेकेदाराला पैसे देऊ शकत नव्हते. अर्णब गोस्वामी आणि अन्वय नाईक यांच्यातील संभाषण झाल्याचा पुरावा पाेलिसांकडे आहे. त्याचप्रमाणे बॅंक खात्यांच्या विवरणावरुनही काही गाेष्टी स्पष्ट हाेत असल्याचे पाेलिसांनी दाेषाराेपपत्रात नमुद केले आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील अर्णब गोस्वामींवर पुन्हा टीका केली आहे. रिपब्लिकन टी.व्ही.चे मुख्य संपादक आणि मालक अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी संबंधित होते काय (Is the case of Arnab Goswami, editor-in-chief and owner of Republican TV, related to freedom of expression?), यावर संशोधन होणे गरजेचे आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात श्री. गोस्वामी यांना अटक झाली. अन्वय यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण मागच्या सरकारने दडपले. त्याची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली गेली. ही मागणी नाईक यांच्या पत्नीनेच केली. त्यावर पुन्हा तपास सुरू झाला. पोलिसांनी गोस्वामी यांना ताब्यात घेतले, पण आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत व केंद्रातील राज्यकर्ते आपल्यासाठी काहीही करतील या भ्रमात काही लोक आहेत व तसेच चित्र दिसले.
मात्र कनिष्ठ न्यायालयाचे अधिकार चिरडून सुप्रीम कोर्टाने घाईघाईने गोस्वामी यांना जामीन दिला व मुंबई उच्च न्यायालयावर ताशेरे ओढले. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हा मुद्दा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले (The Supreme Court ruled that this was an issue of personal freedom). गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर अलिबागच्या सेशन कोर्टात सुनावणी असताना सर्वोच्च न्यायालयाने एकदम सुप्रीम कोर्ट एकाच व्यक्तीसाठी उघडावे तसे केले. गोस्वामी यांना न्याय मागण्याचा, लढा देण्याचा पूर्ण हक्क आहे. मग हा हक्क इतरांसाठी का नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे (Dushyant Dave, chairman of the Supreme Court Bar Council) यांनी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठवून हाच सवाल केला आहे. इंदिरा गांधी तर अशा थराला जात नव्हत्या, असा टोला त्यांनी लगावला आहे.
News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut has also criticized Arnab Goswami again. The case of Arnab Goswami, editor-in-chief and owner of Republican TV, needs to be investigated as to whether it is related to freedom of expression. In the case of Naik’s suicide, Shri. Goswami was arrested. The case of Anvay’s suspicious death was suppressed by the previous government. He was asked to re-investigate. This demand was made by Naik’s wife. The investigation was resumed. The police arrested Goswami, but there are some people who are under the illusion that we are bigger than the law and the central government will do anything for us.
News English Title: Shivsena MP Sanjay Raut raised question over Arnab Goswami and Anvay Naik Scuide case news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News