15 December 2024 7:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

गणेशोत्सवात कोकणात जाताय? पण जिल्हाधिकाऱ्यांकडून बंधनं

No entry, Sindhudurg, Ganeshotsav, Corona Virus

सिंधुदुर्ग, ९ जुलै : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. कोरोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे.

२२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे, त्यानिमित्ताने अनेकजण गावी जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याअनुशंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमान्यांना प्रवेश देण्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वात मुख्य निर्णय म्हणजे इतर जिल्ह्यांतून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक असून ई-पास नसल्यास वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

काय असणार बंधनं?

  • परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना गाव नियंत्रण समितीच्या सल्ल्याने १४ दिवस क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी परजिल्ह्यातून येण्याअगोदर क्वारंटाइन राहण्यासाठी घराची क्षमता, सोयी सुविधा काय आहेत, याची खात्री करूनच जिल्ह्यात यावे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. त्याचवेळी परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या घरातील स्थानिक सदस्यांवर घराबाहेर पडण्याकरता निर्बंध राहणार आहेत, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
  • गृह विलगीकरणाचे नियम मोडणे, ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश करणे इत्यादी कारणांसाठी ५ हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
  • गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू नये. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच खरेदी उरकावी.
  • जिल्ह्यात ३२ सार्वजनिक गणपती असून गणपतीची उंची यंदा कमी ठेवण्यात यावी तसेच बाकी मोठे कार्यक्रम, मिरवणुका करू नयेत.
  • गणेशोत्सवात गावात वाडीवाडी मध्ये एकत्र येऊन भजन, आरती न करता घरातील सदस्यांनीच भजन व आरती करावी. सत्यनारायण महापूजा, डबलबारी भजनांचे आयोजन करण्यात येऊ नये. यावर गाव नियंत्रण समितीने लक्ष ठेवावे.
  • गणपती विसर्जनावेळी एका गणपतीसोबत कुटुंबातील २ सदस्यांनीच उपस्थित राहावे. विसर्जनावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे. विसर्जन मिरवणुका टाळाव्यात. यावरही गाव समितीचे लक्ष असणे आवश्यक आहे.
  • गणेशोत्सवादरम्यान एकमेकांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाऊ नये.
  • गणेश विसर्जनादिवशी सिंधुदुर्गात दुपारचं जेवण अर्थात म्हामंद प्रथा आहे. ते यंदा घरातील लोकांनीच करावे. अन्य कुणाला घरी बोलावू नये.
  • राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी गणेशभक्तांसाठी विशेष बसव्यवस्था करू नये.
  • बाहेरून जिल्ह्यातील गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ग्रामस्तरीय समितीकडे नोंद असणे आवशयक आहे. या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली जावी.
  • गणपतीची पूजा स्वत:च करावी. पुरोहितामार्फत पूजा करण्यासाठी ऑलनाइन पूजेचा पर्याय निवडावा.

 

News English Summary: Ganesha devotees coming to Sindhudurg will be admitted till 7 pm on August 7. An e-pass is required to enter the district and vehicles will not be allowed to enter without an e-pass.

News English Title: No entry to Sindhudurg after 7th August for Ganeshotsav News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x