1 December 2022 8:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा Penny Stock | अपना सपना मणी मणी! या पेनी शेअरने 50 हजारावर 5 लाख परतावा दिला, अजून 35 टक्के वाढणार, नोट करा
x

आई-वडिलांपेक्षा मोदी-शहांच नातं मोठं? | एक वेळ आई-वडिलांना शिव्या द्या, पण मोदी-शहांना शिव्या दिल्यास सहन करणार नाही - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

Chandrakant Patil | भाजपचे नेते कधी कोणतं धक्कादायक वक्तव्य करतील याची शाश्वती देता येणार नाही आणि त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या. कोल्हापूरमध्ये तर आईवरून शिव्या द्यायची पद्धत आहेच. मात्र पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांनी केलेलं हे वक्तव्य समाज माध्यमांवर चांगलंच धुमाकूळ घालतंय.

पुण्यामध्ये एका कार्यक्रमात :
पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत असतांना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले असून आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शहांना शिव्या दिलेल्या चंद्रकांत पाटलांना चालणार नाही,असे एका नेत्याने शेतकरी संघटनेचे नेते असणाऱ्या राजू शेट्टी यांना सांगितल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

यावेळी बोलत असतांना हातकणंगले मतदारसंघातील निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप प्रत्यारोपांचा उल्लेख करत चंद्रकांत पाटील म्हणाले की,“या निवडणूक प्रचारामध्ये राजू शेट्टी हे अनेकदा पंतप्रधान मोदींना शिवागाळ करत होते.मात्र,आम्ही शेट्टींना सव्वा लाख मतांनी हरवलं “,असे पाटील म्हणाले.

दरम्यान,पुढे शेट्टी आणि भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याच्या भेटीमधील चर्चेसंदर्भात सांगत पाटील म्हणाले की,“परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादांनी मला संपवलं. ते केंद्रीय नेते ४० वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले की दादा कोणाला संपवत नाही.आई-वडिलांना शिव्या द्या चालेल ते म्हणतील जाऊ दे.आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे.पण दादा (चंद्रकांत पाटील) मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”,असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Maharashtra minister Chandrakant Patil controversial statement check details 07 October 2022.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(121)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x