27 July 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

75 वा स्वातंत्र्यदिन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण | आरोग्य सुविधांसंबंधित माहिती दिली

75th Independence day

मुंबई, १५ ऑगस्ट | 75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’

तर मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा, असं आवाहन करताना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयी भूमिका स्पष्ट केली. “गेल्या दीड वर्षापासून करोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा.

करोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो”, असं ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 75th Independence day celebration in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x