13 August 2022 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ratna Jyotish | आर्थिक तंगीत अडकलेल्यांना अर्थसंपन्न करेल हे शुभं रत्न, आर्थिक भरभराटीसाठी फायदेशीर अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा
x

पवारांचं राजकारण संपविण्याचं भाष्य करणाऱ्या भाजपच्या चेहऱ्यावरील हास्य संपलं?

BJP, Shivsena, NCP

मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस संपविण्यात भाजपचे राज्यातील प्रमुख नेते त्यात स्वतः देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार आघाडीवर होते. राष्ट्रवादीचे जवळपास ९० टक्के आमदार फोडून पवारांचा आत्मविश्वास संपविण्याचा हेतू पुरस्कर प्रयत्न केला होता. त्यात अनेकांनी राज्यात पवारांच्या राजकारणाचे दिवस संपल्याचं भर सभेत म्हटलं होतं आणि देशात केवळ मोदींच राज्य चालतं असा टोकाचा आत्मविश्वास अनेकदा बोलून दाखवला होता. मात्र निवडणुकीनंतर भाजपच्या त्याच नेत्यांचं हास्य पवारांच्या राजकारणामुळे पूर्ण हरवल्याचं निवडणुकीच्या निकालानंतर पाहायला मिळत आहे. प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बोलल्यासाठी वसवसनारे हेच भाजप नेते सध्या प्रसार माध्यमांच्या कॅमेरापासून तोंड लपवत फिरत आहेत.

दरम्यान,,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले असून हे आमंत्रण फडणवीस स्वीकारणार का? बहुमताच्या अग्निपरीक्षेला ते सामोरे जाणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार होते.

दरम्यान, मार्ग निघत नसल्यानं अखेर पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक सुरू झाली होते. विशेष म्हणजे या बैठकीत भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे कोअर कमिटीच्या नेत्यांना मार्गदर्शन करणार होते. गेल्या दोन आठवड्यांपासून राजकीय गोंधळ सुरू असताना अमित शाह यांचं नाव फारस पुढे आलं नव्हत. आता आज पहिल्यांदाच अमित शाह यांनी सत्तेचा पेच सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचं समजलं होतं.

मात्र राजभवनाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हटलं की, जनतेने जनादेश भाजप आणि शिवसेनेच्या युतीला दिला होता. मात्र शिवसेनेने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असं म्हटलं आहे. मात्र ही देताना भाजपच्या सर्व नेत्यांचे चेहरे रडकुंडीला आल्याचे स्पष्ट दिसत होते, तर काहींनी जबरदस्ती चेहऱ्यावर स्मित हास्य दाखवत होते. त्यामुळे भाजपने विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतल्याचं आता स्पष्ट झाला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांना जयपूरला हलविले आहे. तेथे राज्यातील नेते कालच पोहोचले असून आमदारांशी चर्चा केली आहे. या बैठकीनंतर प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगितले. मात्र, काँग्रेसच्या नेत्याना सोनिया गांधी याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग3ेस राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल मिळाल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x