26 April 2024 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

Global Warming | मुंबईतील नरीमन पॉईंट, मंत्रालय परिसर 80% पाण्याखाली जाईल | महापालिका आयुक्तांचा इशारा

Global warming impact

मुंबई, २८ ऑगस्ट | पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मुंबई वातावरणीय बदल अ‌ॅक्शन प्लॅन योजनेच्या वेबसाईटचं लाँचिंग करण्यात आलं. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावेळी मुंबईकरांना एक इशारा दिला आहे. वातावरणीय बदलांमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन 2050 पर्यंत मुंबईतील नरिमन पॉईंट, मंत्रालय, दक्षिण मुंबईतील ए, बी. सी आणि डी वार्डमधील 80 टक्के भाग पाण्याखाली जाईल, अशी गंभीर भविष्यवाणी केली आहे.

Global Warming, मुंबईतील नरीमन पॉईंट, मंत्रालय परिसर 80% पाण्याखाली जाईल, महापालिका आयुक्तांचा इशारा – BMC commissioner Iqbal Chahal predict global warming impact on Mumbai city till 2050 due to climate change :

निसर्ग इशारे देतोय, गांभीर्यानं घेण्याची गरज:
इकबाल चहल यांनी यावेळी निसर्ग आपल्याला वारंवार इशारे देत आहे. निसर्गाच्या इशाऱ्यानंतरही लोक जागरुक झाले नाहीत तर परिस्थिती धोकादायक होईल. कफ परेड, नरीमन पॉईंट आमि मंत्रालय हा भाग 80 टक्के पाण्याखाली असेल म्हणजे गायब होईल, असं आयुक्तांनी म्हटलं आहे. आता ही फक्त 25 ते 30 वर्षांची बाब राहिली आहे कारण 2050 काही लांब राहिलेलं नाही. आपल्याला निसर्गाकडून वारंवार इशारे मिळत आहेत, आपण त्यावर काम केलं नाहीतर पुढील 25 वर्षात परिस्थिती गंभीर होईल. यामुळे पुढची नाही सध्याची पिढी देखील प्रभावित होईल, असं चहल यांनी सांगितलं. मुंबई महापालिकेच्या वतीन वातावरणीय बदलांच्या निमित्तानं केलेल्या अभ्यासात वातावरणीय बदलामुळं जी क्षेत्र अधिक असुरक्षित आहेत त्या क्षेत्रांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

हवामानाच्या तीव्र परिस्थितीमुळे हाहाकार माजेल:
या संशोधनातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हवामानाची अत्यंत वाईट परिस्थिती. अभ्यासानुसार, भूस्खलन, मुसळधार पाऊस, ढगफुटी, चक्रीवादळ, गारपीट, पूर किंवा तीव्र दुष्काळ यासारख्या आपत्ती जी 50 वर्षांतून एकदा येते असते, 2100 सालापर्यंत दरवर्षी येईल.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात कॅनडाचे तापमान जे सरासरी 16.4 अंश सेल्सिअस असते, ते 49.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. याचे कारण उष्णतेची लाट होती. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यालये, लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली होती. कॅनडातील व्हँकुव्हर, पोर्टलँड, इडाहो, ओरेगॉनच्या रस्त्यांवर वॉटर स्प्रिंकलर मशीन बसवण्यात आली. आगीच्या भीतीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या 2 दिवसात न्यूझीलंडमध्ये 8 इंचापेक्षा जास्त बर्फ पडला. 55 वर्षांनंतर जून -जुलैमध्ये न्यूझीलंडचे तापमान -4 अंशांपर्यंत पोहोचले होते. इतकी थंडी पडत होती की राजधानी वेलिंग्टनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली. समुद्राच्या किनाऱ्यावर 12 मीटर उंच लाटा उसळत होत्या.

पृथ्वीच्या एका भागात मुसळधार पाऊस असेल, तर एक मोठा भाग दुष्काळामुळे ग्रस्त असेल, उष्णतेने तापेल:
संशोधनात असेही दिसून आले आहे की, उच्च अक्षांशांच्या फक्त एका लहान भागात पाऊस पडेल. उच्च अक्षांश क्षेत्र म्हणजे वर्षभर पाऊस पडत असतो. यामध्ये युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा काही भाग आणि न्यूझीलंडचा बहुतेक भाग समाविष्ट आहे. येथे पावसाचा जोर आणखी वाढेल. इतका की पूरसदृश परिस्थिती कायम राहील. उर्वरित मोठा भाग सतत तापत राहिल. याच वर्षी हंगेरी, सर्बिया, युक्रेन या युरोपियन देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट पसरली होती. पारा 40 अंशाच्या वर पोहोचला होता, इटलीमध्ये इतका पाऊस पडला की प्रचंड पूर आला. जर्मनीमध्ये चक्रीवादळाने कहर केला. 120 वर्षांनंतर, रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये तापमान 35 अंशांवर पोहोचले.

वर्षभरापूर्वी जगाच्या हवामानाचा मागोवा ठेवणाऱ्या जागतिक हवामान संघटनेने म्हणजेच WMO ने सांगितले होते की, अंटार्क्टिकाच्या पर्वतांमध्ये तापमान वाढत आहे. 2020 मध्ये प्रथमच येथील तापमान 20 अंशांवर पोहोचले होते. जर हिमनद्या इथे वितळू लागल्या तर समुद्रात वाढलेले पाणी पृथ्वीवर कहर निर्माण करेल.

आपल्याकडे 15 वर्षांत हवामान बदलाचे अत्यंत वाईट परिणाम दाखवणा-या 310 घटना घडल्या आहेत 1970 ते 2005 दरम्यानच्या 35 वर्षांमध्ये, हवामान बदलाच्या अत्यंत वाईट परिस्थितीमुळे 250 घटना घडल्या होत्या, परंतु 2005 ते 2020 दरम्यान, फक्त 15 वर्षात 310 अशा घटना घडल्या. या वर्षी 7 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये हिमनदी फुटल्याने ऋषीगंगा आणि धौलीगंगा खोऱ्यांमध्ये अचानक पूर आला. सुमारे 200 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

संयुक्त राष्ट्राच्या समितीचा इशारा:
मानव समुदायाने आजघडीला कार्बन ऊत्सर्जन लक्षणीयरित्या कमी केले तरीही काही दुष्परिणाम हे टाळणे अशक्यच असल्याचा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील आंतरसरकारी समितीने सोमवारी प्रकाशित केलेल्या एका ताज्या अहवालातून दिला आहे. आपण अगोदरच इतके ऊत्सर्जन करून ठेवले आहे की, त्याचे काही गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागणार असल्याचे या अहवालाच्या निष्कर्षात म्हटले आहे.

या तीन हजार पानी अहवालाच्या निष्कर्षानुसार दोन्ही ध्रुवांवरील हिमनग अतिशय वेगाने वितळत असून सागरी पाणीपातळीही त्याच वेगाने वाढत आहे. याच्या परिणामी ऋतुचक्रातही अतीतीव्र टोकाचे बदल बघायला मिळत आहे. विनाशकारी चक्रीवादळे, महापूर, अतिवृष्टी, ढगफुटी, अतीतीव्र उष्णता आणि अतीतीव्र थंडीच्या लाटा हे याचेच परिणाम आहेत. आज आपण ऊत्सर्जनात लक्षणीय घट केली तरी काही दुष्परिणाम हे टाळता येणे अशक्य असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कारण आपण आधीच वातावरणात मोठ्या प्रमाणात हरीतगृह वायूंचे ऊत्सर्जन करून ठेवले आहे असे यात स्पष्टपणे म्हटले आहे.

मानवी कृतींमुळेच ग्लोबल:
वॉर्मिंगऔद्योगिकीकरणानंतरच्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी प्रामुख्याने उष्णता शोषून घेणारे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनसारखे वायू कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मानवी कृतीद्वारे कोळसा, इंधन, तेल, लाकडू आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून हे निर्माण झाले आहे. यात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाचा अगदीच थोडा वाटा असल्याचे यात म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BMC commissioner Iqbal Chahal predict global warming impact on Mumbai city till 2050 due to climate change.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x