19 January 2022 12:23 AM
अँप डाउनलोड

नाशिक हादरलं | एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन हत्या

Family murdered, Nandgaon, Nashik

नाशिक, ०७ ऑगस्ट : नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आल्याने नाशिक जिल्हा हादरला आहे. चव्हाण कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केल्याची घटना रात्री घडली. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुका हादरला आहे. गळा चिरुन हत्या करण्यात आल्याने चव्हाण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सकाळी ही बाब उघड झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी मालेगांव , नांदगाव पोलीस दाखल झाले आहेत.

समाधान आण्णा चव्हाण( ३७) भरताबाई चव्हाण (३२) गणेश समाधान (६)आरोही समाधान चव्हाण( ४) अशा एकाच कुटुंबातील ही हत्या करण्यात आल्याने अख्खा तालुका हादरला आहे. पहाटेच रिक्षा चालक समाधान चव्हाण त्याची पत्नी मुलगा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसले. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, पोलीस घटनास्थळी पोहचले असून याचा अधिक तपास करत आहेत.

दरोडेखोर की मनोविकृत ? अशी चर्चा सध्या आहे. सर्वसाधारण कुटुंबातील चौघे रात्री मळ्यातल्या घरातल्या ओसरीत झोपलेले होते. रक्ताच्या थारोळ्यात चौघांचे मृतदेह आढळून आल्यानै मोठी खळबळ उडाली. समाधान रिक्षा चालवित असे पण लाँकडाऊनमुळे तोही घरीच होता.बायको भरताबाई मोलमजूरी करीत असे.

 

News English Summary: Nashik district is shaken by the murder of four members of the same family at Jeur near Wakhari in Nandgaon taluka. The murder of a Chavan couple and two children took place last night. Nandgaon taluka is shaken by this massacre.

News English Title: Four members of one family murdered at Nandgaon in Nashik News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nashik(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x