Dipesh Mhatre Vs Raju Patil | मनसे हाच खड्ड्यात गेलेला पक्ष, त्यांनी खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये - दीपेश म्हात्रे
मुंबई, ३० सप्टेंबर | राजू पाटील यांनी काल मलंगगड रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि पालिकेवर जोरदार टीका (Dipesh Mhatre Vs Raju Patil) केली होती. कल्याण-डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्याबाबत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर 114 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च केल्याचं दिसतंय का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. खड्डय़ाचे सोडा पालिकेतील अधिकारी बिले काढण्यासाठी 2 टक्के घेतात. सगळीकडे अडवणूक, फसवणूक सुरू आहे. एक तर लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासक आहे. कशाला कशाचा पायपोस नाही. खड्डे बुजविण्यासाठी आठ वर्षात 114 कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी हीच परिस्थिती असते. त्यामुळे आता यांनी खड्डे भरावेत नाही तर आम्हालाच यांना खड्ड्यात भरावे लागेल, असा संतप्त इशारा त्यांनी दिला होता.
In the 2010 elections of Kalyan-Dombivali Municipal Corporation, 29 MNS corporators were elected. In 2015, 9 MNS corporators were elected. Their numbers dwindled. Therefore, MNS is the party that has gone into the pit said Shivsena leader Dipesh Mhatre :
त्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये वाद वाढण्याची चिन्ह आहेत. कारण आज शिवसेनेने त्यावर पलटवार केला आहे. खड्ड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये, असा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनिी दिला आहे.
दीपेश म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मनसेवर जोरदार टीका केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 2010 सालच्या निवडणूकीत मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते. 2015मध्ये मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे मनसे हाच खड्ड्यात गेलेला पक्ष आहे. त्याने कोणाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये, असा म्हात्रे यांनी दिला आहे. मनसेचेही नगरसेवक महापालिकेत होते. त्यावेळी त्यांनी का कधी खड्ड्यांवरून पालिकेत आवाज उठवला नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.
2014 साली महापालिका हद्दीत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामावर 21 कोटी रुपये खर्च केले जात होते. त्यानंतर महापालिका हद्दीत काही रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले. त्यामुळे 2014 सालानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा खर्च कमी कमी होत गेला आहे. रस्ते विकासासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे 360 कोटींची रस्ते विकासाची कामे लवकर सुरु होणार आहेत. त्यामुळे खड्डे बुजविण्यावरील खर्च आणखीन कमी होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Dipesh Mhatre a Shivsena leader target MNS after allegations of MLA Raju Patil.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- NBCC Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका
- Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
- Niacinamide Serum | चेहऱ्यावरील काळे डाग गायब करेल एलोवेरा आणि ग्रीन टीपासून बनलेलं हे सिरम, एकदा वापरून पहाच
- Big Boss Marathi | शिवीगाळ करून BIP-BIP ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा; जानवी किल्लेकरच्या जाऊबाई संतापल्या
- Kawasaki Ninja Discount | जबरदस्त! कावासाकी बाईक खरेदीवर 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर, खरेदीला गर्दी
- L&T Share Price | L&T शेअर शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करून देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, फायदा घ्या
- Cetaphil Face Wash | पदार्थांपेक्षा जास्त तेल चेहऱ्यावरच दिसतं? हे 5 फोमिंग फेस वॉश ट्राय करा; चेहरा दिसेल वाव
- Santosh Juvekar | ह्या वेड्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं"; संतोष जुवेकरने सांगितला अनुराग कश्यपसोबतचा अनुभव
- Royal Enfield Classic 350 | नवी रॉयल एनफिल्ड क्लासिक लाँच, पाहा व्हेरियंटनिहाय किंमत आणि फीचर्स
- PPF Investment | दर महिना बचतीवर मॅच्युरिटीला मिळतील 16 लाखा रुपये, या सरकारी योजनेत बिंधास्तपणे पैसे गुंतवा