17 May 2021 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू
x

आ. राजू पाटील यांच्या प्रयत्नाने लोकग्राम रेल्वे पादचारी पुलासाठी ३८ कोटी ५७ लाख निधी मंजूर

MNS MLA Raju Patil, Kalyan Gramin

कल्याण: देशभर आमदार आणि खासदार असे महत्वाचे लोकप्रतिनिधी नकोत्या विषयात गुंतलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं आहे त्यासाठी ते पूर्णत्वाला घेऊन जाण्यात गुंतले आहेत. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच ते विकास कामांचा मोगोवा घेत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यासाठी त्यांनी कल्याण-डोंबिवली मधील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विकास कामांना हात घातला आहे आणि तडीस घेऊन जाण्यास प्रशासकीय पातळीवर मोठी धावपळ करताना दिसत आहेत. त्यासाठी कल्याण डोंबिवलीतील मनसेची संपूर्ण टीम त्यांच्यासोबत पाठपुरावा करताना दिसत आहे. आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा घेतलेल्या अजून एका महत्वाच्या कामाला प्रशासन पातळीवर गती मिळाली आहे.

कल्याण रेल्वेस्थानक ते लोकग्रामला जोडणारा पादचारी पूल मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे. सदर पूल महापालिकेच्या स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत उभारला जाणार आहे. या पुलासंदर्भात महापालिका, स्मार्टसिटीचे अधिकारी आणि रेल्वेप्रशासन यांची आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत एक संयुक्त बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झालं आहे. कारण या पुलाच्या उभारणीसाठी एकूण ३८ कोटी ५७ लाख निधी मजूर करण्यात आल्याने स्थानिक लोकांची मोठी मागणी पूर्णत्वाला येणार आहे.

 

Web Title:  MNS Kalyan Gramin MLA Raju Patil request is accepted on Lokgram Bridge construction.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x