11 August 2022 7:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | पायऱ्यांवर एकदा पडला, लगेच कपडे बदलून आला आणि पुन्हा काय झालं त्याचा व्हायरल व्हिडिओ पहा Horoscope Today | 12 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा Lucky Numbers | या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 12 ऑगस्टचा दिवस वरदान, नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग Short Term Investment | अल्प मुदतीसाठी गुंतवणूक, 1 महिना ते 1 वर्ष मॅच्युरिटी असलेली स्कीम निवडा, 24 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळतात 5G Smartphone Under 15K | 15 हजारांच्या आतील टॉप 5G स्मार्टफोन, फीचर्स चेप करा आणि स्वस्तात निवडा SBI Mutual Funds | एसबीआय फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करणारे मालामाल झाले, तुम्हीही करू शकता छप्परफाड कमाई
x

या वर्षातील इंटरटेनिंग ट्विट; 'देवेंद्रजी आणि अजित पवारजी तुम्ही करून दाखवलं'

Amruta Fadnavis, Devendra Fadnavis

मुंबई: राजकारण म्हटलं की नेते मंडळी नेहमीच स्वतःला समाज माध्यमांवरून एखाद्या घटनेवरून प्रतिक्रिया किंवा मत व्यक्त करत असतात. राज्याच्या राजकारणात अनेक मुख्यंमत्री होऊन गेले, मात्र त्यांच्या अर्धांगिनी कधीच झगमगत्या दुनियेत दिसल्या नाहीत. अर्थात याला अपवाद ठरल्या त्या अमृता फडणवीस.

ऍक्सिस बँकेत ब्रांच मॅनेजर असलेली व्यक्ती अचानक सेलिब्रेटींच्या’मध्ये कोणत्या ना कोणत्यातरी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिसू लागल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्याने त्यादेखील समाज माध्यमांवर कार्यरत झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी देवेंद्र फडणवीस आधी विरोधी पक्ष नेते पदी असताना देखील त्या सर्वसाधारण व्यक्तिमत्वाप्रमाणे वावरताना दिसल्या. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच त्यांच्या व्यक्तिमत्वात शंभर टक्के बदल झाल्याचं सहज नजरेस पडताना दिसलं. परंतु, विषय एवढ्यावरच थांबला नाही, कारण पतीदेव राजकारणी असल्यामुळे त्यांच्या ट्विट्स देखील एखाद्या राजकारणी व्यक्ती प्रमाणे वेळोवेळी पलटी मारताना दिसल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत त्यांनी दोन घटनांवर समाज माध्यमांवर ट्विस्ट केले होते आणि या दोन्ही ट्विट्स एखाद्या राजकारण्याला देखील लाजवतील अशा होत्या.

म्हणजे ९ नोव्हेंबरला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा बहुमत नसल्याने आम्ही म्हणजे भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात बसणार अशी घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली तेव्हा अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यात त्या म्हटल्या होत्या, ‘तुमच्या भूमिकेचा मला अभिमान आहे’. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप, महाराष्ट्र भाजप आणि राष्ट्रीय भाजपाला मेन्शन केलं होतं.

मात्र, ज्या पतिदेवांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लक्ष करून बैलगाडीसहित मोर्चा काढून सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे असल्याचं सांगत अजित पवारांच्या घोटाळ्याला निवडणुकीतील प्रचाराचा मुख्य मुद्दा केला होता आणि भाषणात चक्की पासिंग, चक्की पासिंग अशी खिल्ली उडवली होती, त्या अजित पवारांसोबत २३ नोव्हेंबर तारखेला सकाळी राज्यातील जनता झोपेतून देखील उठलेली नसताना लपून शपथविधी उरकून घेतला, त्यावर त्यांनी पहिल्या ट्विट’सारखे अभिमानाचे मुद्दे बाजूला ठेवत एखाद्या पलटणाऱ्या राजकारण्यासारखं दुसरं ट्विट करत म्हटलं, ‘देवेन्द्रजी आणि अजित पवारजी अभिनंदन! तुम्ही करून दाखवलं’. त्यामुळे त्यांच्या या बदलणाऱ्या भूमिकेतून त्यादेखील राजकारण शिकल्या असंच म्हणावं लागेल. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या वेळेनुसार बदलणाऱ्या भूमिका आणि त्यासंदर्भातील ट्विट्स सर्वाधिक चर्चेचा आणि इंटरटेनिंग विषय ठरल्याचं पाहायला मिळालं.

 

Web Title:  Amruta Fadnavis’s most Entertaining Twits of the year.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x