19 April 2024 6:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेला धूळ चारत भाजपने असा जल्लोष केला

MLA Deepak Kesarkar, Shivsena, MLA Nitesh Rane

सावंतवाडी: एकीकडे मुंबईत नव्या ठाकरे सरकारच्या पहिल्या वहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी सुरू असताना तिकडे कोकणात भाजपनं शिवसेनेला जोरदार धोबीपछाड दिली आहे. कोकणातल्या सावंतवाडीमध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा तब्बल ३०९ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला . या विजयानंतर भाजपच्या गोटामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला.

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी रविवारी मतदान झाले. या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तब्बल ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर, भाजपचे अधिकृत उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब, महाविकास आघाडीचे खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, काँग्रेसचे ॲड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, अमोल साटेलकर हे निवडणूक लढवत होते.

मागील अनेक वर्षांपासून इथे शिवसेनेचाच नगराध्यक्ष होता. मुळात दीपक केसरकर यांचा हा गड मानला जात होता. त्यामुळे दीपक केसरकर विरूद्ध नारायण राणे अशा प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीमध्ये भाजपची सरशी झाली आणि सावंतवाडीचं नगराध्यक्षपद शिवसेनेच्या हातून निसटलं. सावंतवाडी येथील जिमखाना परिसरात आज मतमोजणी झाली.

मुळात कोकणच्या विकासात केसरकर यांचा काहीच वाटा नसून ते केवळ राणे कुटुंबियांवर आरोप आणि टीका करून स्वतःची राजकीय पोळी भाजत असल्याचं कोकणात सर्वश्रुत आहे. शिवसेनेकडे देखील दुसरा पर्याय नसल्याने केसरकरांचं फावत असल्याचं स्थानिक शिवसैनिकांना वाटतं आहे. त्यामुळे ते पुन्हा तोच एक कलमी कार्यक्रम पुन्हा ५ वर्ष सुरु ठेवतील अशीच स्थानिक लोकांची धारणा झाली आहे. दरम्यान, मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या दीपक केसरकारांचा मंत्रिमंडळ वाटपात देखील पत्ता कट झाला आहे.

 

Web Title:  BJP celebrate after victory at Sawantwadi Nagaradhyaksha Election against Shivsena.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x