13 February 2025 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | महिना 40 हजार पगार असणाऱ्या खाजगी पगारदारांच्या खात्यात 3,46,154 रुपये जमा होणार, अपडेट जाणून घ्या 8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार, रक्कम जाणून घ्या Salary Vs Savings Account | 90% लोकांना माहिती नाही सॅलरी अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधील फरक, व्याजदर ते मिनिमम बॅलन्स अटी पहा Tax Exemption on HRA | पगारदारांनो, तुमचा HRA वर टॅक्स सवलत मिळणार का, कसा फायदा होईल समजून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त बचत करा या SBI फंडाच्या योजनेत, महिना 2500 रुपये एसआयपीवर 1.18 कोटी रुपये मिळतील SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या Gratuity Money Alert | खाजगी पगारदारांसाठी 25 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी वाढली, तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल इथे पहा
x

सामना जाहिरातीत नाणार'चा उदोउदो! फसव्या भूमिकेतील शिवसेना पकडली गेल्याची चर्चा

Saamana Newspaper, Advertisement of Nanar Refinery project

मुंबई: लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत नाणार प्रकल्पाविरोधात आघाडी उघडत मते मिळवणाऱ्या शिवसेनेची नाणारवरून कोंडी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामनात’च नाणार प्रकल्पाचा उदोउदो करणारी जाहिरात छापून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातच ही जाहिरात आल्याने कोकणात नाणार प्रकल्प राबविला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे कोकणवासियांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या जाहिरातीमुळे शिवसेना स्वतःच स्वतःच्या सापळ्यात अडकली आहे.

सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली आहे. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर जाहिरातीत आहे. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच’, असा उल्लेख जाहिरातीमध्ये आहे.

राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आणि नंतर भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेने कोकणात राबविल्या जाणाऱ्या नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कोकणात नाणारच्या विरोधात प्रचार करून मतेही मिळविली होती. निवडणूक वचननाम्यातही नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याचं वचन शिवसेनेने दिलं होतं. मात्र आता राज्यात आघाडी सरकारमध्ये सामिल होताच शिवसेनेने नाणारवरून भूमिका बदलल्याचं बोललं जात आहे.

नाणार रिफायनरीच्या उभारणीत दीड लाख लोकांना रोजगार मिळेल. रिफायनरी कार्यान्वित झाल्यामुळे २० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळतील. यामुळे कोकणवासियांचं स्थलांतर थांबेल, असा दावा आरआरपीसीएलनं जाहिरातीत केला आहे. शिवसेनेनं याआधी सातत्यानं नाणार प्रकल्पाला विरोध केला होता.

वृत्तपत्रात नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहीरात छापून आल्याप्रकरणी खासदार विनायक राउत यांनी खुलासा केला आहे. सामना हे शिवसेनेचं जरी मुखपत्र असलं तरी हे वृत्तपत्र असल्याचं म्हणत वृत्तपत्रांमध्ये इतर जाहिराती येतात तशीच ती जाहिरात आली असेल असं स्पष्टीकरण विनायक राऊतांनी दिलं आहे. सामनाच्या या जाहिरातीमुळे कोकणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

याविषयी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, ‘कंपनी अशा जाहिराती देत असली तरी ते स्वत:च्या मनात मांडे खात असतील. पण सरकारने हा प्रकल्प केव्हाच गुंडाळलेला आहे. जोपर्यंत स्थानिक जनता हा प्रकल्प हवा आहे म्हणून म्हणत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पाबाबत कोणताही विचार करणार नाहीत’ असं खासदार राऊत यावेळी म्हणाले.

 

Web Title: Advertisement of Nanar Refinery project published in Shivsena Saamana Newspaper.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x