6 August 2020 4:17 AM
अँप डाउनलोड

सत्तास्थापनासंदर्भात शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीची निर्णायक बैठक

NCP President Sharad Pawar, Congress

नवी दिल्ली: एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी काँग्रेस-एनसीपी’च्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे बडे नेते उपस्थित असून राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्याचा अंतिम निर्णय या बैठकीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

काँग्रेसच्यावतीने ज्येष्ठ नेते अहमद पटेल, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयराम रमेश, नसीम खान यांची उपस्थिती आहे. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा या बैठकीत समावेश नाही. तर एनसीपी’कडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांची उपस्थिती आहे.

दरम्यान, या बैठकीआधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली. राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत जायचं का? यावर काँग्रेसमध्ये गेले काही दिवस विचार मंथन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास मंजूरी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सत्तेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x