23 September 2021 2:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

सणांच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी हल्ला करण्याचा कट | दिल्लीत 2 दहशतवाद्यांसह 6 जणांना अटक

6 suspects terrorists arrested in Delhi

नवी दिल्ली, १४ सप्टेंबर | दिल्लीत पाकिस्तानचा मोठा दहशतवादी कट उघड झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सणांच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी हल्ला करण्याचा कट, दिल्लीत 2 दहशतवाद्यांसह 6 जणांना अटक – 6 suspects including two Pakistani terrorists arrested in Delhi :

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, यासाठी मल्टी स्टेट ऑपरेशन करण्यात आले. या कारवाई दरम्यान, दोन्ही दहशतवाद्यांव्यतिरिक्त, आणखी 4 लोकांना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण 6 लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून पकडण्यात आले आहे.

मिळेलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी ISI च्या देखरेखीखाली भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी अटक केलेले आरोपी शस्त्रास्त्रे तसेच दारुगोळा जमवत होते. मात्र, या घातपातची माहिती दिल्ली पोलीस विशेष कक्षाला तसेच एटीएसला समजली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या एटीएससोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छापेमारी केली. तसेच येथे तीन संशयित आरोपींना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दारुगोळा तसेच शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत.

सणांच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी हल्ला करण्याचा कट:
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळतेय. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 6 suspects including two Pakistani terrorists arrested in Delhi.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(266)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x