Health First | गाढ झोपेत उंचावरून पडल्याचा भास होतो? | ‘हिपनिक जर्क’ म्हणजे काय? - नक्की वाचा
मुंबई, ०६ सप्टेंबर | अनेकदा आपण खूप दमून आलो कि गाढ झोपी जातो आणि अश्या गाढ झोपेत अचानक हिसका लागुन जाग येते. काय ओ? तुमच्याही सोबत असं झालंय? झोपेत उंचावरून पडणे किंवा धडपणे, असे भास तुम्हाला वारंवार होतात का? तर घाबरु नका…कारण हे अन्य काहीही नसून ‘हिपनिक जर्क’ आहे.
गाढ झोपेत उंचावरून पडल्याचा भास होतो?, ‘हिपनिक जर्क’ म्हणजे काय? – Hypnic Jerking Symptoms and How To Stop It :
‘हिपनिक जर्क’ म्हणजे काय?
हिपनिक जर्क’ हा कोणताही आजार किंवा मज्जासंस्थेचा विकार नाही. हा फक्त झोपेत शरीराला किंवा स्नायुंना बसणारा एक हिसका आहे. जो फक्त झोप लागल्यानंतर पहिल्या काहीच तासात आपल्याला जाणवतो. याला झोपेत बसलेला हिसका अर्थात स्लीप ट्विच किंवा मायोक्लोनिक जर्क या नावानेही ओळखतात. मित्रांनो, सामान्यत: जगातील ७०% लोकांना ‘हिपनिक जर्क’चा अनुभव हा येतोच. पण याबाबत अनेक सामान्य गैरसमज आहेत. याचे कारण असे कि आपल्याला हिपनिक जर्क मागील नेमकी कारणेच ठाऊक नसतात. शिवाय तो का होतो? कश्यामुळे होतो? आणि यावर उपाय आहेत का? हेही माहित नसल्यामुळे याबाबत केवळ विविध तर्क वितर्क लावले जातात. म्हणूनच आम्ही तुम्हाला ‘हिपनिक जर्क’बद्दल सर्वकाही माहिती एकाच लेखातून देणार आहोत. फक्त ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल.
झोपेत ‘हिपनिक जर्क’ बसण्यामागील कारणे:
१) झोपण्यापुर्वी दारु किंवा कॅफेन अर्थात चहा कॉफीचे सेवन केल्यास ‘हिपनिक जर्क’ची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यापुर्वी असे पदार्थ पिणे प्रामुख्याने टाळावे.
२) संध्याकाळी उशीरा केलेल्या व्यायामामुळे कॅलशियम, मॅग्नेशियम किंवा लोह(आयर्न)च्या यांची शरीरातील कमतरता झोपेत अचानक हिसका बसण्याचे कारण असू शकते.
३) गाढ झोपेत शरीर भले आराम करत असेल तरी मेंदुचा काही भाग मात्र सक्रीय असतो. त्यामुळे झोपण्याची पद्धत चुकली किंवा झोप अर्धवट झाली तर शरीराला हिसका बसतो.
४) अति प्रमाणात औषधांचे सेवन केले असता हिपनिक जर्कचा त्रास होतो.
Why Does Your Body Twitch As You’re Falling Asleep :
हिपनिक जर्क’ का आणि कशामुळे लागतो?
बहुतेकदा दमल्यामुळे आपण पटकन झोपतो, तेव्हा ‘हिपनिक जर्क’ लागतो. कारण झोपेच्या पहिल्या टप्यात श्वास आणि ह्रदयाचे ठोके हळुहळु मंदावतात. मात्र खुप दमलेल्या अवस्थेत जेव्हा पटकन झोप लागते तेव्हा स्नायु शिथिल होतात पण मेंदू सक्रीय असतो. यामुळे आपल्याला अचानक घसरल्याचा किंवा उंचावरून पडल्याचा भास होतो.
हिपनिक जर्क’पासून आपला बचाव कसा कराल ?
हिपनिक जर्क हि काही फार मोठी समस्या नसली तरीही हि समस्या आहे. कारण यामुळे शरीर पूर्ण आराम घेऊ शकत नाही. परिणामी झोपेच्या कमतरतेमुळे इतर आजार होऊ शकतात. याकरिता हिपनिक जर्कपासून आपला बचाव कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे. यासाठी काय करता येईल ते खालीलप्रमाणे:-
१) दररोज रात्री संपुर्ण ८ तास झोप घ्या.
२) दररोज सकाळी ठरलेल्या वेळी उठण्याचा प्रयत्न करा.
३) झोपण्याच्या कमीतकमी ६ तास आधी व्यायाम करणे टाळा.
४) झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करा किंवा एखादे पुस्तक वाचा.
५) झोपण्यापुर्वी सोडा, कॉफी पिणे. धुम्रपान किंवा मद्यपान करणे या सवयींपासून दुर रहा.
६) सायंकाळी किंवा झोपताना कोणताही विचार बाजूला ठेवून झोपी जा.
७) आहारात गोड आणि मीठाचा वापर कमी करा. याऐवजी भरपूर ताज्या भाज्या व फळे खा.
हिपनिक जर्क’वर उपाय आहे का नाही?
हिपनिक जर्कसाठी काहीही विशेष कारण नाही. त्यामुळे यावर कोणतेही औषध किंवा उपाययोजना उपलब्ध नाही. परंतु उत्तेजक पदार्थांचे सेवन टाळल्यामुळे आणि झोपेचे योग्य नियोजन केल्यास ‘हिपनिक जर्क’ टाळता येतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Title: Hypnic Jerking Symptoms and How To Stop It.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा