7 August 2020 2:32 PM
अँप डाउनलोड

मनसेची राज्यपालांकडे मागणी; ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व सरसकट पीक विमा

MNS, Raj Thackeray, Farmers, Governor

मुंबई : राज्यात निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अडथळे येत असल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान महाशिवआघाडीचं सरकार स्थापण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्यातरी सरकार स्थापनेला मोठा विलंब होणार हे निश्चित आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

मात्र दुसऱ्याबाजूला राष्ट्रपती राजवट लागली आणि प्रशासकीय यंत्रणा देखील सुस्तावली आहे. अवकाळी पावसामुळे रडकुंडीला आलेला शेतकरी सध्या प्रशासकीय पातळीवर मदत प्राप्त करण्यास प्रचंड अडथळे पार करत असला तरी मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढताना दिसत आहे. तत्पूर्वी राज्यपालांनी जाहीर केलेली तातडीची मदत अत्यंत कमी असल्याने मनसेने ती मदत अजून वाढवावी अशी मागणी करणार असल्याचे वृत्त होतं.

त्यानुसार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई, सरसकट पीक विमा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

आज बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, अभिजित पानसे, संदीप देशपांडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, ‘सध्या राज्यात जी परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे राज्यपाल या राज्याचे पालक आहेत. त्यांच्याकडे आम्ही काही रास्त मागण्या केल्या आहेत. त्यावर राज्यपालांनी सांगितले की, राज्यात सरकार लवकरात लवकर बसलं तर बरं होईल, बऱ्याचशा तुमच्या मागण्या पुढे नेता येतील.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(632)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x