29 September 2020 2:32 AM
अँप डाउनलोड

पकडलेल्या भारतीय पायलटला सम्मानाने वागवा, पाकिस्तान जनतेची मागणी #SayNoToWar

Pakistan, pakistan army, indian army, indian pilot abhinandan, pakistan air force, maharashtranama, digital newspaper, marathi newspaper

भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानी जनतेने इम्रान सरकार विरोधात नाराजीचा सूर लावला. आणि सरकार इन – ऍक्शन आहे हे दाखवण्यासाठी पाकिस्तान एअर फोर्स ची तीन लढाऊ विमानं भारतीय हद्दीद घुसली. सूत्रांच्या माहितीनुसार कृष्णा घाटीतलं बटालियन हेडक्वार्टर त्यांच्या टार्गेटवर होतं. परंतु भारतीय हवाई दल प्रत्येक हल्ला रोखण्यासाठी तयारीतच होतं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पाकिस्तान एअर फोर्स ची ३ युद्ध विमानं भारतीय हद्दीत शिरताच भारतीय एअर फोर्स ने त्यांना प्रत्युत्तर देत त्यातील १ विमान हाणून पाडले परंतु त्यातील पायलट बेपत्ता असल्याची माहिती दिली. आणि या चकमकीत आपले १ विमान पाकिस्तान हद्दीत क्रॅश झाले, परंतु त्याचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांचे प्राण वाचले.

त्यांना जिवंत पाहताच तिकडे उपस्थित असलेल्या काश्मीर मुक्त चळवळीच्या काही लोकांनी त्यांना लाथा बुक्याने मारायला सुरुवात केली परंतु पाकिस्तान आर्मी वेळेत आली आणि त्यांनी अभिनंदन यांना लोकांच्या तावडीतून सोडविले आणि सुखरूप स्थळावर घेऊन गेले. त्या पायलटचा व्हिडिओ पाकिस्ताननंच मुद्दाम रिलीज केला. त्यानंतर पाकिस्तानमधूनच अनेकांनी त्याला चांगली वागणूक द्या, सन्मानानं वागवा, असं ट्वविट केलंय.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची पुतणी फातिमा भुत्तो यांनी ट्विट करून त्या पायलटसाठी प्रार्थना केली. त्यांना सन्मानानं वागवा,असं सांगितलंय. त्या म्हणाल्या, “पाकिस्तानमधून अनेकांचं असं म्हणणं आहे की त्या पायलटना सन्मानानं वागवा, कसलीही भीती न बाळगता तुम्ही असं वागवाल, तर मला नक्कीच अभिमान वाटेल. आपल्याला युद्ध नकोय. मग सर्वांसाठीच सन्मान, शांतता, समोपचार बाळगायला हवा.”

अभिनंदन हे सुखरूप असल्याचा व्हिडीओ

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x