19 March 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | अवघ्या 21 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Reliance Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रिलायन्स इन्फ्रा शेअरने 2 दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा
x

भारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO

India corona pandemic

नवी दिल्ली, १२ मे | देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेकांनी त्यावर यशस्वीरित्या मात केली आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा वेग मंदावत असताना काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

कारण दुसरीकडे यूपी-बिहारसारखी काही राज्ये सर्वाधिक टेस्ट केल्याचा दावे करतात, मात्र लोकसंख्येशी प्रमाण बघता ही दोन्ही राज्ये टॉप-२० मध्येही येत नाहीत. डब्ल्यूएचओनुसार, संसर्गाचा दर ५% पेक्षा जास्त असल्यास स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे समजले जाते. ३३ कोटी लोकसंख्येच्या अमेरिकेत ४३ कोटी टेस्ट झाल्या आहेत. १३० कोटींच्या भारतात केवळ ३० कोटी टेस्ट झाल्या आहेत. अमेरिकेने संसर्गाचा दर कधीही १५% वर जाऊ दिला नाही. भारतात मात्र तो २३% इतका झाला आहे.

भारतात मागील ऑक्टोबर महिन्यात सापडलेला कोरोनाचा बी.१.६१७ हा उत्परिवर्तीत विषाणू वेगाने पसरत असून त्यामुळे जगभरातच जोखीम निर्माण झाली आहे. वेगाने पसरण्याच्या क्षमतेमुळे हे उत्परिवर्तन जागतिक चिंतेचा विषय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तंत्रज्ञ प्रमुख मारिया व्हॅन केरखोव यांनी सांगितले की, बी.१.६१७ हा मूळ विषाणूपेक्षा वेगाने पसरणारा असून तो घातक असल्याची माहिती मिळाली आहे. या विषाणूचा मूळ प्रकार ऑक्टोबर २०२० मध्ये सापडला होता पण नंतर तोच विषाणू डिसेंबरमध्ये काही उत्परिवर्तनांसह सापडला होता. भारताली उत्परिवर्तनाचा हा विषाणू १९ देशांत पसरला असून अनेक देशांनी भारतात जाण्यास प्रवासबंदी लागू केली आहे.

तसेच केरखोव यांनी सांगितले की, या विषाणू उपप्रकाराबाबत तसेच इतर ३ प्रकारांबाबत माहिती घेतली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ‘टुगेदर फॉर इंडिया’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात प्राणवायू, औषधे, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरणे यासाठी निधी संकलन करण्यात येत आहे.

 

News English Summary: Corona B 1.617 a mutant virus found in India last October, is spreading rapidly, posing a global threat. The World Health Organization has declared the mutation a global concern due to its ability to spread rapidly.

News English Title: Corona B 1 617 a mutant virus found in India has ability to spread rapidly said World Health Organization news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x