26 July 2021 4:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

गोव्यात ऑक्सिजन अभावी २६ रुग्णांचा मृत्यू | भाजपच्या वाचाळ नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी - रुपाली चाकणकर

India corona pandemic

पुणे, १२ मे | गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी पहाटे २६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी रुग्णालयाला पुरेसा प्राणवायू पुरवठा नव्हता, अशी कबुली राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गोव्याच्या शासकीय रुग्णालयात मंगळवारी पहाटे २ ते ६ या कालावधीत २६ रुग्ण दगावले, असे राणे यांनी सांगितले, मात्र मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यास त्यांनी नकार दिला. या रुग्णालयाला सोमवारी प्राणवायूचा पुरवठा कमी झाला होता, हे मात्र त्यांनी मान्य केले. या रुग्णालयाला प्राणवायूच्या मोठ्या १२०० सिलिंडरची गरज होती. त्यापैकी फक्त ४०० सिलिंडर सोमवारी उपलब्ध झाले होते, असे राणे यांनी सांगितले.

दरम्यान, नाशिक ऑक्सिजन गळतीवरून राजकारण करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चांगलेच झापले आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलंय की, “काल गोव्यात ऑक्सिजन गळतीमुळे अनेक रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी चालून आली आहे. भाजपच्या वाचाळ नेत्यांनी ताबडतोब गोव्याला जाऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी. प्रवासाचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत”.

 

News English Summary: An unfortunate incident took place in Goa yesterday when an oxygen leak killed several patients. BJP leaders in Maharashtra have an opportunity to do politics of death. The talkative leaders of the BJP should immediately go to Goa and demand a presidential rule. We are willing to pay for the trip.

News English Title: Goa oxygen shortage patients death NCP leader Rupali Chakankar slams BJP leaders of Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#NCP(361)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x