3 July 2020 3:27 PM
अँप डाउनलोड

देशात एकच भाषा लादता येणार नाही, अन्यथा जनआंदोलन उभारू: कमल हसन

Amit Shah, Kamal Haasan, Tamil language, Hindi language

चेन्नई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक देश, एक भाषा’ याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता अभिनेता आणि राजकीय नेता कमल हसनने उडी घेतली आहे. पूर्ण देशात एकच भाषा लादता येणार नाही, असे करण्याच्या प्रयत्न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत कमल हसन यांनी शहा यांच्या वक्तव्याला विरोध केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कोणताही शहा, सुलतान, सम्राट १९५० मध्ये जनतेला दिलेले आश्वासन मोडू शकत नाही, असे कमल हसन म्हणाले. 1950 मध्ये देश प्रजासत्ताक झाल्यावर प्रत्येक क्षेत्राची भाषा आणि संस्कृती वेगवेगळी आहे, त्याचा सन्मान करण्यात येईल आणि भाषा, संस्कृतीची जपणूक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. देशाच्या एकतेसाठी अनेक राजांनी आणि संस्थानांनी आपले राज्य सोडले. मात्र, आपली भाषा, संस्कृती आणि ओळख जनतेला कायम ठेवायची आहे. कोणत्याही परिस्थितीत जनतेला आपली संस्कृती जोपासायची आहे, असे ते म्हणाले.

आपल्या देशातील विविधतेतच एकता आहे. त्यामुळे देशात एखादी गोष्ट लादणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. देशात नवा कायदा किंवा योजना आणण्याआधी सरकारने जनतेशी संवाद साधणे अपेक्षित आहे. जलीकट्टू खेळासाठी फक्त निदर्शने करण्यात आली होती. मात्र, आता भाषा वाचवण्यासाठी जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. हिंदी भाषा निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी देशाची राजभाषा असून देशात सर्व व्यवहार होतील अशी एकच भाषा असावी, असे मत व्यक्त केले होते. त्यावर दक्षिणेकडील राज्यांनी विरोध प्रदर्शन सुरू केले आहे.

अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या देशाच्या एकतेसाठी त्याग केला आहे. मात्र, लोक आपली भाषा, संस्कृती आणि ओळख विसरू शकत नाहीत. भारत एक असा देश आहे, त्याठिकाणी लोक एकत्र बसून जेवण करतात. कोणावर काही लादू शकत नाही, असे कमल हासन यांनी म्हटले आहे. याशिवाय नवीन कायदा लागू करण्याआधी सामान्य लोकांशी चर्चा केली पाहिजे. जलीकट्टूसाठी जे झाले ते फक्त प्रदर्शन होते. मात्र, भाषा वाचवण्यासाठी जे होईल, ते यापेक्षा मोठे होईल, असा इशाराही कमल हासन यांनी दिला आहे.

दरम्यान हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आज ‘एक देश एक भाषा’ या धोरणाला समर्थन केल्यामुळे पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. अनेक भाषा आपल्याला देशाची मोठी ताकद आहे. मात्र, देशाची एक भाषा गरजेची आहे, कारण विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही. देशाची एक भाषा लक्षात घेऊन आपल्या पुर्वजांनी राजभाषेची कल्पना केली होती आणि राजभाषेच्या रुपाने हिंदी स्वीकारली होती. त्यामुळे हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, असे हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह यांनी म्हटले होते.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(238)#Kamal Haasan(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x