14 September 2024 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

SaveAarey: पोलखोल; वृक्षतोडीच्या समर्थनार्थ आलेले ते 'मॅनेज' RSS व भाजप कार्यकर्ते: सविस्तर

RSS, BJP, SaveAarey, Save Aarey, Save Trees, Save Forest

मुंबई: मेट्रो-३ साठी कारडेपोच्या निमीत्ताने मुंबईतील आरे कॉलनीत हजारो वृक्षांची कत्तल होण्यास सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. कॉलनीतील झाडे वाचविण्यासाठी (मेट्रोच्या विरोधात नाही) भर पावसात हजारो सामान्य मुंबईकर, स्थानिक आदिवासी समाजातील तरुण, विद्यार्थी,पर्यावरणवादी संस्था, तसेच अनेक सामाजिक संस्था आंदोलने करत आहेत.

सध्या समाज माध्यमांवर जोर धरत असून त्यासाठी नेटकरी देखील हॅशटॅग #SaveAareyForest अभियान राबवत असून त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान या अभियानात अनेक राजकीय पक्ष देखील उतरले असून त्यांनी देखील जनसुनावणी पासून सर्वच विषयांवर सहभाग नोंदवून वृक्षतोडीला विरोध केला आहे. यांमध्ये मनसे अग्रस्थानी असून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे ह्यांनी सुद्धा ह्या वृक्षतोडीला विरोध केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ह्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

मात्र यात एक धक्कादायक गोष्ट घडली आणि अचानक अनेक सामान्य मुंबईकरांचा एक गट हजर झाला आणि आम्ही सामान्य मुंबईकर या वृक्षतोडीला समर्थन करत आहोत असं वातावरण निर्माण करू लागले आहेत. दरम्यान, सरकारच्या मर्जीतले काही अधिकारी व पत्रकार ह्या झाडांच्या कत्तलीला सर्मथन करणाऱ्या हा गटाला सरळ पाठिंबा देत आहेत.

मात्र त्यामध्ये एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते, आरएसएस संबंधित कार्यकर्ते आणि संघटनांना हाताशी धरून एक वेगळीच हवा निर्मिती करून मुंबईकरांचे #SaveAarey अभियान हाणून पाडण्यासाठी सामान्य मुंबईकर म्हणून मुखवटा घालून आपलीच लोकं पाठवली आहेत.

बांद्रा येथील मेट्रोच्या प्रशासकीय कार्यालयाजवळ शुक्रवारी आरेमधील वृक्षतोड च्या विरोधात असणारे सामाजिक कार्यकर्ते जमा झाले होते पण त्याआधीच काही मॅनेज केलेले लोक देखील हजर होते. ह्यांची संख्या अंदाजे ४०च्या घरात होती. मात्र ह्यांना त्यांच्या पक्षासंबंधित प्रसार माध्यमांनी आणि मुंबई मेट्रोच्या अधिकृत हॅण्डल ने वारेमाप प्रसिद्धी दिली व मुंबईकरांचा पाठींबा आहे ह्या वृक्षांचे खून पाडायला अश्या बातम्या चालविल्या. विशेष म्हणजे याच प्रकल्पाची जवाबदारी असलेल्या अधिकारी अश्विनी भिडे ज्या सामान्य नागरिकांना याच विषयावरून कधीच भेटत नाहीत त्यांनी याच मॅनेज लोकांना विशेष भेट देऊन फोटोसेशन देखील केल्याचं समोर आलं आहे. संबंधित नियोजनबद्ध घडवलेला प्रकार अत्यंत धक्कादायक असून मुंबईकरांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचं सांगत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यात SaveAarey अभियानाला कधीच प्रसिद्धी न देणाऱ्या अधिकारी अश्विनी भिडे याच वृक्षतोडीला समर्थन करणाऱ्या लोकांना मुंबई मेट्रो३ या अधिकृत ट्विटर पेजवरून प्रसिद्धी देताना दिसल्या हा ऐतिहासिक योगायोग म्हणावा लागेल.

 

संपूर्ण चौकशी असता हे विशेष मुंबईकर होते कोण ? तुम्हाला माहित आहे का ? तर नाही कारण तुम्हाला ते जागृत आणि प्रामाणिक प्रसार माध्यमचं दाखवतील आणि दरबारी मीडिया वेगळंच चित्र निर्माण करतील. त्यातील सर्व जण हे भाजप व RSS ह्यांच्याशी निगडित असल्याचं सिद्ध झालं आहे. ह्यां खास लोकांना जेव्हा महाराष्ट्र टाईम्स ह्या वृत्तपत्राच्या पत्रकार अनुजा चवाथे ह्यांनी काही प्रश्न विचारले तेव्हा अक्षरशः टाळाटाळ केल्याचं पाहायला मिळालं. त्यातील काहींना तर आपण नेमकं कशासाठी आलो आहोत हेच सांगता येत नव्हते, सगळे उचलून आणलेले होते .

आता त्यात सहभागी असणाऱ्या संस्था व कार्यकर्ते ह्यांचा पंचनामा;
१ . भटू सावंत: संस्था – जागृत भारत मंच आणि खरी ओळख मुंबई “तरुण भारत” पेपरचे पत्रकार
२. मधू कोटीयन: संस्था – मुंबई रेल्वे प्रवासी संघ आणि खरी ओळख हि संघटना भाजपच्या रेल्वे आघाडीचा एक भाग आहे
३. भूषण मर्दे: संस्था – मंथन संस्था आणि खरी ओळख संघ स्वयंसेवक
४ .कैलास वर्मा: संस्था – रेल्वे प्रवासी संघटना आणि खरी ओळख भाजप कार्यकर्ते
५ . विशाल टिबरेवाल: संस्थ – ग्रीन ट्रिब्युनल आणि खरी ओळख RSS नमो भक्त
६. नाव माहित नाही मात्र निवेदन देताना एक महिला दिसत आहे जी वांद्रे मधील भाजप कार्यकर्ती आहे.

मुंबईमेट्रो-३ या ट्विटर पेजने ज्या ग्रीन ट्रिब्युनल संस्थेच्या विशाल टिबरेवाल यांना प्रसिद्धी दिली ते स्वतः RSS वाले आहेत. त्याचे खाली पुरावे.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x