19 August 2022 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा Tata Group Stocks | टाटा समूहच्या या शेअर्सनी गुंतवणूक दुप्पट केली, पुढे आणखी वाढण्याची शक्यता, खरेदीचा सल्ला Viral Video | जगातील सर्वात तरुण फिनलँडच्या महिला पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टीत दारू पिऊन गोंधळ, व्हिडिओ व्हायरल Atmanirbhar Bharat Failure | आत्मनिर्भर भारत फक्त मार्केटिंग घोषणा?, देशातील 15% पेक्षा जास्त आयात चीन'मधून होते आहे Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या
x

Pain in Right Side of Chest | उजव्या छातीत दुखतंय? | असू शकतात 'ही' कारणं - नक्की वाचा

Pain in right side of Chest

मुंबई, २४ ऑगस्ट | छातीत कळ आली, छातीत दुखायला लागलं की मला हार्ट अटॅक आलाय असंच प्रत्येकाला वाटतं. मात्र प्रत्येक वेळी छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅकच असेल असं नाही. त्यातही जर तुमच्या छातीच्या उजव्या बाजूला दुखत असेल. तर तो हार्ट अटॅक नसून, त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात.

उजव्या छातीत दुखतंय?, असू शकतात ‘ही’ कारणं – Pain in right side of Chest reasons in Marathi :

अँझायटी किंवा पॅनिक अटॅक:
छातीत दुखणं हे अँझायटी किंवा पॅनिक अटॅकचं लक्षण असू शकतं. छातीच्या स्नायूंवर ताण आल्याने असं होतं. एकदा का पॅनिक अटॅक येणं बंद झासलं की छातीतील वेदना आपोआप बंद होतात.

स्नायूंवर ताण:
तुम्ही नेहमी जीमला जाता का किंवा मेहनतीचं असं काम करता का, तर तुमच्या छातीतील दुखण्यामागे स्नायूंवर आलेला ताण कारणीभूत असू शकतो. तुम्ही उजव्या हाताचा सर्वात जास्त वापर करता त्यामुळे छातीच्या उजव्या बाजूवर ताण येतो. अशावेळी पेनकिलर, कोल्ड कम्प्रेसर किंवा पुरेशा आरामाने स्नायूंवरील ताण कमी करता येईल.

अॅसिड रिफ्लेक्स:
गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लेक्स डिसीज (GERD) आणि अॅसिड रिफ्लेक्स असल्यास हार्टबर्न म्हणजे छातीत जळजळ होते. अँटासाईड घेतल्यानंतर जर तुमच्या उजव्या छातीतील वेदना दूर झाल्या, तर GERD किंवा अॅसिड रिफ्लेक्समुळे तुमच्या छातीत दुखत असावं.

Chest Pain causes & treatment in Marathi

पित्ताशयाला सूज:  
पित्ताशयाला काही कारणामुळे सूज आली असल्यास शरीराच्या उजव्या बाजूची छाती, पोट, खांदा आणि पाठीत दुखतं. याशिवाय मळमळ, उलटी, घाम, भूक मंदावणं, ताप अशी लक्षणंही दिसून येतात.

स्वादुपिंडाला सूज:
पॅनक्रिएटायटिस (Pancreatitis) म्हणजे स्वादुपिंडाला सूज आल्यासही उजव्या छातीत आणि पाठीत दुखतं. छातीत दुखत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याला गांभीर्याने घ्या. विशेषत जर छातीत वेदना होण्यासह चक्कर, मळमळ, उलटी, घाम, छातीतील वेदना डावा हात, खांदा किंवा जबड्यापर्यंत जात असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जा. त्यामुळे छातीत दुखण्याची कारणं माहिती झाली असली, तरी घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Pain in right side of Chest reasons in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x