12 December 2024 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

Viral Video | प्रवाशांनी ट्रेनमध्ये मोबाईल चोर पकडला आणि त्याला असा ट्रेनच्या बाहेर लटकवला, चोराची अवस्था व्हायरल व्हिडिओत पहा

Thief Video

Thief Video | दिवसेंदिवस चोरीचे प्रमाणा वाढत चालले आहे. कधी कुठे चालता-बोलता चोरी होईल ते सांगता येत नाही. सर्वांत जास्त चोरी गर्दी मध्ये होते नकळत तुमच्या खिश्यातून चोरी केलेली सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्रेनमधील आहे तर तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हा व्हिडिओ एका ट्रेनमधील आहे, जिथे लोकांनी एका स्नॅचरला खिडकीला लटकवून ठेवले आहे.

चोराला लोकांनी अद्दल घडवली :
हा चोर चालत्या ट्रेनमधून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत होता आणि नंतर लोकांनी त्याला पकडले, यानंतर त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चोर आपल्या जीवाची भीक मागत असल्याचे दिसून येत आहे. या महिन्यात बिहारमधील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे तसेच या महिन्याच्या सुरुवातीला बेगुसराय येथूनही अशीच एक घटना समोर आली होती.

व्हिडीओ झाला व्हायरल
हा व्हिडिओ भागलपूर जिल्ह्यातील एका पॅसेंजर ट्रेनचा आहे, इथे अशा घटना अनेकदा घडत असतात. मात्र, यावेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि पाहताच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, ही घटना लैलाख-घोघा रेल्वे स्थानकादरम्यानची आहे. तर चोरट्यांची एक संपूर्ण टोळी येथे सक्रिय असल्याचे समोर आले आहे. मात्र त्याचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. तुम्ही व्हिडीओ मध्ये पाहू शकता की, एका प्रवाशाने खिडकीतून हात घालून त्या चोराचा जिव वाचवला आहे. यानंतर प्रवाशांनी पकडलेल्या चोराला ट्रेनमध्ये ओढले आणि बेदम मारहाण केली तसेच व्हिडिओमध्ये ट्रेनला लटकलेली व्यक्ती प्रवाशांना सांगत आहे की, भाई, हात सोडू नको, नाहीतर मी मरेन. कथित चोर कुठे पकडला गेला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of the mobile thief caught by peoples in train trending on social media checks details 30 September 2022.

हॅशटॅग्स

Thief Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x