26 July 2021 1:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

मी अन्वय नाईक प्रकरणी कारवाई केली आणि मोहन डेलकर आत्महत्येनंतर SIT नेमली म्हणून....

Anil Deshmukh

नागपूर, ११ मे | मला प्रसार माध्यमांच्या माध्यमातुन अशी माहिती मिळत आहे की, ईडीकडुन आता माझी चौकशी होणार आहे. मी न केलेल्या गुन्हयाची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतुपोटी सुरु आहे. मी गृहमंत्री असतांना मधल्या काळात काही महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार नाराज असून शकते आणि त्यामुळे माझी चौकशी सिबीआय व ईडीच्या माध्यमातुन होत आहे. पण एक आहे “सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही” असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुढे बोलतांना अनिल देशमुख म्हणाले की, मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा अनेक योग्य निर्णय मी घेतले. यात प्रामुख्याने सिबीआयची स्थापना झाल्यापासुन महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरचा तपास करायचा असेल तर राज्य सराकारच्या परवागीची गरज नव्हती. परंतु ऑक्टोबर २०२० ला गृहविभागाने निर्णय घेतला की, सिबीआयला जर महाराष्ट्रात तपास करायचा असले तर राज्य सरकारची परवानगी घेने बंधनकारक केले. महाराष्ट्राने हा निर्णय घेतल्या नंतर देशातील अनेक राज्याने महाराष्ट्र सरकार प्रमाणेच निर्णय घेतला असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

त्यानंतर दादरा नगर हवेलीचे सात वेळा खासदार असलेले मोहन डेलकर यांनी मुंबई येथे येवून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा योग्य तपास होण्याची मागणी अनेक आमदारांनी अधिवेशानात केली होती. त्यावरुन मी एसआयटी गठीत करुन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करुन योग्य तपास सुरु केला. या सर्व गोष्टीमुळे केंद्र सरकार माझ्यावर नाराज असु शकते. त्यामुळेच सिबीआय आणि ईडीच्या मार्फत माझी चौकशी सुरु आहे. ज्या पध्दतीने मी सिबीआयला चौकशीसाठी सहकार्य केले त्याच पध्दतीने ईडीला सुध्दा सहकार्य करणार असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: I am getting information from the media that I am going to be questioned by the ED. Punishment for crimes I did not commit is politically motivated. The Center may be upset over some important decisions taken in the middle of my tenure as Home Minister and hence my inquiry is being conducted through CBI and ED.

News English Title: I will cooperate with ED over investigation said former home minister Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x