15 December 2024 8:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

IPL २०१९: मुंबईचा चेन्नईवर दणदणीत विजय

Mumbai Indian, Chennai Kings

मुंबई : मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानात जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या माऱ्याच्या जोरावर चेन्नईचा विजयरथ रोखला. यासह मुंबईने आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत शंभराव्या विजयाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नईचा तब्बल ३७ धावा अशा मोठ्या फरकाने पराभव केला.

दोन माजी विजेत्या संघांमध्ये सुरू असलेल्या लढतीत यजमान मुंबईने सूर्यकुमार यादव, पांड्या बंधू यांनी केलेल्या सुरेख फटकेबाजीच्या जोरावर महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नईसमोर १७१ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले. १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला वीस षटकांच्या अखेरीस आठ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून मराठमोळ्या केदार जाधवने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली, परंतु त्याला इतर खेळाडूंची हवीतशी साथ मिळाली नाही. केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मुंबईकडून लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने ३-३ बळी घेतले. त्यांना बेहरनडॉर्फने २ बळी घेत चांगली साथ दिली.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. सुरुवातीला त्याचा हा निर्णय चेन्नईसाठी फायदेशीरच ठरला. मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर डीकॉकला तिसर्‍याच षटकांत चहरने अवघ्या ४ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर कर्णधार शर्मा फार काळ टिकला नाही. जडेजाने त्याला धोनीमार्फत १३ धावांवर झेलबाद करून मुंबईला दुसरा मोठा धक्‍का दिला. यंदा प्रथमच मुंबई संघातर्फे खेळणार्‍या युवराजसिंगने पुन्हा एकदा निराशा केली. ताहीरने त्याला रायडूमार्फत ४ धावांवर झेलबाद केले. त्यावेळी मुंबईची अवस्था ३ बाद ५० धावा अशी बिकट झाली होती. मग सूर्यकुमार यादव अणि कृणाल पांड्या यांनी ४ थ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करून मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी संयमी फलंदाजी करून मुंबईला तारले.

अखेर ही जमलेली जोडी मोहित शर्माने फोडली. त्याने पांड्याला जडेजामार्फत ४२ धावांवर झेलबाद केले. त्याने ३२ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकार मारला. पांड्या पाठोपाठ सूर्यकुमार यादवदेखील लगेचच बाद झाला. त्याला ब्राव्होने जडेजामार्फत ५९ धावांवर झेलबाद केले. ४३ चेंडू खेळताना यादवने ८ चौकार आणि १ षटकार मारले. नंतर आलेल्या हार्दिक पंड्याने चेन्नई गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढविला. त्याने अवघ्या ८ चेंडूंत ३ षटकर आणि १ चौकार मारून नाबाद २५ धावा ठोकल्या. तर पोलार्डने ७ चेंडूंत २ चौकार मारून नाबाद १७ धावा केल्या. या दोघांनी ब्राव्होच्या शेवटच्या षटकांत तब्बल २९ धावा फटकावल्या. त्यामध्ये ३ षटकार आणि १ चौकाराचा समावेश आहे. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ४५ धावांची झटपट भागीदारी केली. प्रथम फलंदाजी करणार्‍या मुंबईने २० षटकांत ५ बाद १७० धावांची चांगली मजल मारली.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x