12 December 2024 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Gold Silver Price Today | सोनं-चांदी महागली | पहा आजचे नवे दर

Gold Silver Price Today

मुंबई, १८ ऑक्टोबर | मागील आठवड्यात दसऱ्याच्या दिवशी झालेल्या नफावसुलीने सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली होती. सोने जवळपास ७०० रुपयांनी घसरले होते तर चांदीमध्ये ३०० रुपयांची घसरण झाली होती. आज दोन्ही मौल्यवान धातूंनी आठवड्याची सकारात्मक सुरुवात (Gold Silver Price Today) केली आहे. आज कमॉडिटी बाजारात सोने ९५ रुपयांनी तर चांदी २१९ रुपयांनी महागली आहे.

Gold Silver Price Today. Today, both the precious metals have made a positive start to the week. Today, gold is up by Rs 95 and silver by Rs 219 in the commodity market. At present, the price of 10 grams of gold on the Multi Commodity Exchange is Rs 47,295. It has increased by Rs 82. Earlier, gold had risen to Rs 47,312 :

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७२९५ रुपये आहे. त्यात ८२ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोने ४७३१२ रुपयांपर्यंत वाढले होते. आज एक किलो चांदीचा भाव ६३४९० रुपये असून त्यात २१९ रुपयांची वाढ झाली आहे.

मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी सोने आणि चांदीला नफेखोरीची झळ बसली होती. सोन्याचा भाव ६६८ रुपयांनी कमी झाला आणि तो ४७२१४ रुपयांवर स्थिरावला होता. बाजार बंद होताना चांदीमध्ये देखील ३१५ रुपयांची घसरण झाली आणि चांदीचा भाव ६३२४० रुपयांवर स्थिरावला होता.

दरम्यान, मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.

मिस कॉल करून जाणून घ्या सोन्याचे दर:
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर मोबाईलवर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे काम अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Gold Silver Price Today on 18 October in Mumbai updated on MCX market.

हॅशटॅग्स

#GoldPrice(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x