14 December 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

भाजपा है तो बेरोजगारी है, भाजपा है तो प्याज १०० रु किलो है: प्रियांका गांधींकडून मोदींची खिल्ली

Modi Government, Priyanka Gandhi

नवी दिल्ली: देशभरात केंद्रातील भाजप नेतृत्वातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोषामुळे भडका उडाला आहे. काँग्रेसदेखील याचा विरोध करण्याकरिता स्त्यावर उतरलेली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक अशा रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता रॅलीला सुरुवात होणार असून यामध्ये नागरिकत्व सुधारणा विधयेक, वाढती महागाई, महिला सुरक्षा, सर्वसामान्यांची होणारी लूट या सारख्या विषयावर रॅलीतून प्रहार करण्याची योजना आखण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही मोठी रॅली आहे. या रॅलीपूर्वी ज्याप्रकारे भाजपाने संसदेत राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केलो होता. त्यामुळे आज या रॅलीद्वारे काँग्रेस नेत्यांबरोबरच राहुल गांधी यांचाही आक्रमक पवित्रा पहायला मिळू शकतो. काँग्रेस या रॅलीमध्ये आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन मोदी सरकारला घेरणार आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजला. त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी लोकसभेत लावून धरली असताना दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आम्हाला न्याय हवा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते. राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल असे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. तरीही सत्ताधारी व विरोधी बाकांवरून सुरू असलेला गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकुब केले.

दरम्यान, प्रियांका गांधी यांनी उपस्थितांना संबोधित करताना मोदी सरकारच्या घोषणांचा उलटा पाढा वाचला. “या जाहिरातींच्या उलट परिस्थिती देशात असून भाजपा आहे म्हणून संविधानविरोधी कायदे तयार होत आहेत. भाजपा आहे म्हणून विकास दर घटला आहे, कांदा १०० रुपये किलो झाला आहे. भाजपा आहे म्हणून ४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी शक्य झाली आहे, भाजपा आहे म्हणून ४ कोटी रोजगार नष्ट होणे शक्य झाले आहे. न्याय मिळणे हा कायद्याच्या राज्यात प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, भाजपा आहे म्हणून आज देशात चारही बाजूला अन्यायाचे वातावरण आहे. गरीबांना अडचणीत आणले जात आहे तर श्रीमंतांचे लाड केले जात आहेत.” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

प्रियंका गांधी म्हणाल्या, “देशाच्या प्रत्येक नागरिकाला मी सांगू इच्छिते की, आपला आवाज उठवा, देशाचा आवाज बना. जर आज आपण आवाज उठवला नाही, गप्प बसलो तर आपल्या डोळ्यासमोर आपले क्रांतीकारक संविधान नष्ट होईल.

 

Web Title:  Priyanka Gandhi criticized Modi Government over Marketing Slogans

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x