25 September 2022 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यातील तरुणांचा रोजगाराचा मुद्दा गंभीर होऊ लागताच शिंदे गटाकडून धामिर्क मुद्द्यांवर भर, 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा रोजगार निर्माण करणार? Ankita Bhandari Murder | अंकिता भंडारी मर्डर केस, भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी, भाजप नेत्याच्या रिसॉर्टला लोकांनी आग लावली शिंदेंच्या राजवटीत चाललंय काय?, राज्यातून रोजगारही जातोय, तिकडे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी, इकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या शिवसेनकडून भाजपाला धक्के, भाजपचे 12 नगरसेवक संपर्कात, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघें कार्यकर्त्यासहित शिवसेनेत Horoscope Today | 25 सप्टेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 25 सप्टेंबर, रविवारसाठी तुमचा लकी नंबर आणि काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र
x

एखादा व्यवसाय करायचा आहे? | आधार कार्ड फ्रेंचाइजी घ्या | वाचा ऑनलाईन प्रक्रिया

How to apply for Aadhar card E Seva Kendra

मुंबई, ०९ ऑगस्ट | तुम्ही जर सध्या पैसे कमवण्यासाठी एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर, तर आधार कार्ड फ्रेंचाइजी घेण्यासाठी चांगली संधी आहे. आधार कार्डची फ्रेंचाइजी घेऊन कमाईची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. पण ही फ्रेंचाइजी घेणार कशी? हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लायसन्स घ्यावं लागेल. हे लायसन्स घेण्यासाठी एक परीक्षा पास करावी लागेल. जाणून घ्या काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया..

लायसन्स घेण्यासाठी UIDAIकडून एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा UIDAI सर्टिफिकेशनसाठी घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यास आपल्याला आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक करावं लागतं. त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. सर्व प्रथम एनएसईआयटीच्या (NSEIT) वेबसाइटवर जा. इथं तुम्हाला Create New User ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आता एक एक्सएमएल फाईल उघडेल. तिथं Share Code enter टाकण्यास सांगितले जाईल.

एक्सएमएल फाइल आणि शेअर कोडसाठी आपण आधारच्या वेबसाइट https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन आपले ऑफलाइन ई-आधार डाउनलोड करू शकता. यावेळी एक्सएमएल फाईल आणि शेअर कोड दोन्ही डाउनलोड केले जातील. वर उल्लेख केलेल्या ठिकाणी त्यांचा वापर करावा.

आता आणखी एक फॉर्म येईल ज्यामध्ये आपल्याला काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
* हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड येईल.
* याद्वारे आपण Aadhaar Testing and Certification पोर्टलवर लॉग इन करू शकाल.
* त्यानंतर Continue बटणावर क्लिक करा.
* आता एक फॉर्म समोर येईल, त्यामध्ये विचारलेली माहिती योग्यरित्या भरा.
* हा फॉर्म भरल्यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.
* आता तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शन दिसेल.
* यामध्ये तुम्ही फॉर्ममध्ये दिलेली माहिती बरोबर आहे की नाही हे याची खात्री करून घ्या.
* आता Proceed to submit form वर क्लिक करा.
* सर्व माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

त्यानंतर 1 ते 2 दिवसांनंतर वेबसाइटवर परत लॉग इन करा आणि Book Center वर क्लिक करा. इथं आपल्या जवळचे कोणतेही केंद्र निवडा. तुम्हाला या केंद्रावर आधार परीक्षा द्यावी लागेल. तारीख आणि वेळ निवडा आणि फॉर्म सबमिट करा. यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला प्रवेशपत्र (Admit Card) मिळेल. हे प्रवेश पत्र डाउनलोड करून प्रिंट करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for Aadhar card E Seva Kendra online in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Aadhar Card(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x