12 December 2024 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

शेतकऱ्यांना तीन तास वाट पहायला लावली | चर्चेची 11वी फेरीही निष्फळ

Farmers Protest, Farm laws, Tractors Rally

नवी दिल्ली, २२ जानेवारी: राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील 58 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यात चर्चेची 11वी फेरी पार पडली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. शेतकरी, सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांची दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी बैठक सुरु झाली होती. दुपारी 1 वाजून 9 मिनिटांनी सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांनी प्रस्तावावर पुन्हा विचार करावा.

मंत्र्यांनी आम्हाला साडे तीन तास वाट पहायला लावली. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. जेव्हा ते आले तेव्हा आम्हाला सरकारच्या प्रस्तावावर विचार करण्यास सांगितलं. तसंच आता बैठकांची प्रक्रिया संपवत असल्याचंही म्हणाले,” अशी माहिती किसान मजदूर संघर्ष समितीचे श्रवण सिंह पंढेर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा आंदोलन शांततेच्या मार्गाने यापुढेही सुरु राहील असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारने यासंदर्भात म्हटले की आम्ही शेतकऱ्यांना सर्व प्रस्ताव दिले आहेत. परंतु शेतकऱ्यांकडे त्यापेक्षा चांगले पर्याय असल्यास ते सरकारकडे येऊ शकतात, असं सरकारचं म्हणणं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ११ बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता सरकार कठोर भूमिका घेताना दिसत आहे. ‘दोन वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देऊ, असा प्रस्ताव आम्ही दिला. हा आमच्याकडून दिला गेलेला सर्वोत्तम आणि अंतिम प्रस्ताव होता. यापुढे आमच्याकडून कोणताही प्रस्ताव दिला जाणार नाही’, अशी भूमिका सरकारनं घेतली आहे.

 

News English Summary: However, no solution was reached in this meeting either. The meeting of farmers, government ministers and officials started at 12.50 pm. At 1:09 p.m., the government said farmers should reconsider the proposal.

News English Title: Farmers Protest breakthrough union government offers stay laws farmers want repeal news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x