26 September 2020 8:27 PM
अँप डाउनलोड

नाशिक: बनावट नोटा प्रकरणातील आरोपी छबू नागरेचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena, NCP Chabu Naagre, Shivsena Chabu Naagre, Fake Currency

नाशिकः राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा त्यात सर्वात मोठा समावेश आहे. दिग्गज नेत्यांना थेट मातोश्री आणि वर्षा निवासवर प्रवेश दिले जाती आहेत. त्यात अनेक ठिकाणी कोणतीही तत्व आणि पार्श्वभूमी न पाहता केवळ निवडणूक जिंकायच्याच या उद्देशाने प्रवेश देणं सुरु आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तसाच काहीसा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसचा विवादित कार्यकर्ता छबू नागरे याने अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. छबू नागरे बनावट नोटा प्रकरणी काही काळ अटकेत होता. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे छबू नागरे याचा खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश देण्यात येणार होता. मात्र प्रसार माध्यमांना सुगावा लागल्याने खासदार संजय राऊत यांनी या पक्षप्रवेशाकडे पाठ फिरवली.

कारण छबू नागरे बनावट नोटा प्रकरणी सध्या जामिनावर आहे. सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर समजला जातो आणि त्यामुळे प्रसार माध्यमांमध्ये पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने आणि वाद टाळण्यासाठी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा काही पदाधिकाऱ्यांनी जाणूनबुजून टाळल्याचे म्हटले जातं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(134)#Shivsena(923)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x