25 April 2024 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

जिओ गिगाफायबर लॉन्च, टीव्ही मिळणार मोफत! काय आहेत प्लॅन्स आणि ऑफर

Jio GigaFiber, Broadband, Reliance Jio, Internet, Super Net

मुंबई : रिलायन्स जियोची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर गुरुवारी लॉन्च झाली. या सेवेंतर्गत जिओने मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. या प्लॅन्सनुसार ग्राहकांना १ जीबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेवेच्या गोल्ड आणि त्यावरील सर्व प्लॅन्ससाठी 4K स्मार्ट टीव्हीसेटही मोफत मिळणार आहे.

देशातील १६०० शहरांमध्ये ही सेवा कार्यान्वित करण्यात आली असल्याचं रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितलं. जिओ गिगाफायबरचा बँकांशी भागीदारीत करार केला आहे त्यामुळे ग्राहकांना इएमआय योजनेचाही लाभ घेता येईल. यामुळे ग्राहकांना महिन्याला इएमआय भरून वार्षिक प्लानही घेता येईल, असे कंपनीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जिओ फायबरद्वारे लाँच करण्यात आलेले सर्व प्लान वेलकम ऑफर सोबतच येतात. यात ग्राहकांना ५ हजार रुपये किंमतीचा किंवा जिओ होम गेट वे सर्व्हिससह ६,४०० रुपयांचा जिओ ४ के सेट टॉप बॉक्स, टीव्ही संच (गोल्डन प्लान किंवा त्याहून अधिक), ओटीटी अॅप्स, अमर्याद व्हॉइस आणि डेटाचा लाभ घेता येणार आहे. जागतिक दरांच्या तुलनेत १० टक्के कमी किंमत, यामुळे सर्वांना या सेवेचा लाभ मिळणार असून याचे प्लान सर्वांच्या खिशाला परवडणारे आणि प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणारे आहेत, असा दावा रिलायन्स जिओने केला आहे.

रिलायन्स जिओचा सुरुवातीचा प्लॅन Bronze आहे. यामध्ये ग्राहकाला 100 mbps पर्यंत इंटरनेट मिळणार आहे. अनलिमिटेड डेटा (100GB+50GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. यामध्ये फ्री व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना फायदा होणार आहे. म्हणजेच, ग्राहक भारतातील कोणत्याही नंबरवर कॉल करु शकतात.

849 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय असणार?
849 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 mbps इंटरनेट स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा (200GB+200GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. याशिवाय फ्री व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. तसेच, ग्राहकांना भारतातील कोणत्याही नंबरवर कॉल करता येणार आहे. शकतात.

1,299 रुपयांच्या प्लॅमध्ये मिळणार मोफत टीव्ही
जिओच्या 1,299 रुपयांच्या गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकांना 250 mbps स्पीडचे इंटरनेट मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा (500GB+250GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. याशिवाय, मोफत व्हाईस कॉलिंगचा ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 4K स्मार्ट टीव्ही मिळणार आहे.

2,499 रुपयांचा मासिक प्लॅन
रिलायन्स जिओच्या 2,499 रुपयांच्या डायमंड प्लॅनमध्ये ग्राहकांना 500 mbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिडेट डेटा (1250 GB+250GB एक्स्ट्रा) मिळणार आहे. यात ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा होणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 24 इंचाचा एचडी टीव्ही मिळणार आहे.

3,999 रुपयांचा प्लॅनमध्ये 1Gbps चे इंटरनेट स्पीड
रिलायन्स जियोच्या 3,999 रुपयांचया प्लॅटिनम प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 1Gbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तसेच, ग्राहकांना अनलिमिडेट डेटा (2500 GB) मिळणार आहे. यात ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा होणार आहे. तसेच, ग्राहकांना या प्लॅनमध्ये 32 इंचाचा एचडी टीव्ही मिळणार आहे.

8,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 43 इंचाचा टीव्ही
रिलायन्स जियोच्या 8,499 रुपयांचया प्लॅटिनम प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 1Gbps चे इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये 43 इंचाचा 4K टीव्ही मिळणार आहे. यात टीव्हीची किंमत MRP 44,990 रुपये आहे. तसेच, यामध्ये ग्राहकांना एक महिन्यासाठी 5000 GB डेटा मिळणार आहे.

हॅशटॅग्स

#JIO(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x