14 December 2024 5:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

कोरोनावरील दोन स्वदेशी लसींची मानवी चाचणी सुरु : ICMR

India, Covid 19 Vaccine, ICMR

नवी दिल्ली, १४ जुलै : जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला असून देशात कोरोनाचे रुग्ण ९ लाखावर गेले आहे. यामुळे सध्याची परिस्थिती फार गंभीर झाली आहे, अशा स्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोनावर दोन लसी विकसित करण्यात आल्या असून मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे. विशेष म्हणजे उंदीर आणि संशयित अशा दोन्ही स्वदेशी लसींची टॉक्सिसिटी स्टडीज यशस्वी झाली आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.

कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादची कंपनी भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली आहे. यासाठी पुण्यातील एनआयव्हीने कोरोनाचा स्ट्रेन उपलब्ध करून दिला होता. पटना एम्स (AIIMS-Patna) मध्ये या औषधाच्या चाचणीसाठी हॉस्पिटलने निवडलेल्या 10 जणांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे, असे ऑल इंडिया रेडिओने म्हटले आहे. यानुसार कोरोनाच्या या लसीचा पहिला डोस या रुग्णांना देण्यात आला असून यावर निरिक्षणे नोंदविण्यात येत आहेत. यानंतर 14 दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे.

कोरोनावरील मानवी चाचणी घेण्यासाठी या महिन्यात आम्हाला परवानगी दिली गेली आहे. त्याप्रमाणे दोन्ही मानवी लसींच्या चाचणीसाठी तयारी करण्यात आली असून या दोन्ही लसींसाठी एक – एक हजार नागरिकांचा क्लिनिकल स्टडीही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जगभरात वापरण्यात येणाऱ्या लसींपैकी ६० टक्के लस या भारत बनवत आहे. हे संपूर्ण जगाला माहिती असून प्रत्येक देश भारताच्या संपर्कात देखील आहे.

 

News English Summary: In India, two vaccines have been developed on corona and human testing is also allowed, said ICMR Director Dr. Given by Balram Bhargava. In particular, toxicity studies of both rats and suspected indigenous vaccines have been successful, he added.

News English Title: India pharmacy of the world on fast track mode to develop Covid 19 vaccine ICMR News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x