12 December 2024 5:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

१५ ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास मूर्खपणाचा - वैज्ञानिकांची प्रतिक्रिया

Covid 19 Vaccine, August 15, Scientists Angry, ICMR

नवी दिल्ली, ४ जुलै : कोरोना संसर्गावर स्वदेशात बनविलेली कोव्हॅक्सिन ही पहिली प्रतिबंधक लस स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्याकरिता इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व भारत बायोटेक यांच्या सहकार्याने तयार होत असलेल्या कोव्हॅक्सिनच्या माणसांवरील चाचण्या ७ जुलैपासून सुरू कराव्यात असे पत्र आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी संबंधित बारा संस्थांना पाठविले आहे.

भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली होती. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली होती. त्यानंतर भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळे करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं होतं.

कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी १५ ऑगस्टपर्यंत देशी लस वापरात आणण्याच्या मोदी सरकारच्या संकल्पावरून सध्या देशात मतभेद निर्माण झाले आहेत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (ICMR) नुकतीच १५ ऑगस्टला कोरोनावरील देशी लसीचे लोकार्पण होईल, अशी शक्यता बोलून दाखवली होती. मात्र, १५ ऑगस्टपर्यंत लस आणण्याचा अट्टाहास धोकादायक आणि मूर्खपणाचा ठरेल, असे मत अनेक वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस तयार करणे, हे जवळपास अशक्य आहे. मात्र, हे अप्राप्य लक्ष्य गाठण्याच्या नादात सुरक्षा आणि कार्यक्षमता या निकषांकडे दुर्लक्ष होण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ICMR च्या या वक्तव्याबद्दल ‘एम्स’चे संचालक आणि नॅशनल टास्क फोर्सच्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. १५ ऑगस्टपर्यंत लस तयार करणे ही खूप अवघड आणि आव्हानात्मक कामगिरी आहे. एखादी लस वापरताना कार्यक्षमता आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण ही लस तयार केली तरी त्याचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन हेदेखील आव्हानच असेल, असे रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.

 

News English Summary: Many scientists have expressed the view that insisting on bringing the vaccine by August 15 would be dangerous and foolish. It is almost impossible to get the corona vaccine ready by August 15.

News English Title: Covid 19 Vaccine by August 15 Scientists say ICMR claim absurd and risky News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x