12 December 2024 10:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

सबसिडी, कर्जमाफी फक्त कॉपोर्टेस आणि मोदी सरकारच्या मित्रांना | बाकी सर्वांनी आत्मनिर्भर व्हा

Mumbai Congress, President Bhai Jagtap, Modi govt

मुंबई, ०६ मार्च: आत्मनिर्भर भारत हा केवळ सरकारच्या धोरणाचा भाग नसून तो राष्ट्रीय भावना व जिद्दीचा भाग आहे. स्वयंपूर्ण भारताचा हा मंत्र आता देशातील खेड्यापाड्यात पोहोचत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्चच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले होते.

एका बाजूला निवडक धनाढ्य उद्योगपतींच्या व्यवसाय वाढीला पोषक वातावरण निर्माण होईल याची काळजी केंद्र सरकार घेताना दिसत आहे. मात्र सामान्य मनाच्या रोजच्या गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. एकाबाजूला विना अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत वाढविल्यानंतर सबसिडी वाढते, असा ग्राहकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण डिसेंबर महिन्यात १०० रुपये दरवाढ केल्यानंतरही ग्राहकांच्या बँक खात्यात नोव्हेंबरएवढीच सबसिडी जमा होत आहे. घरगुती सिलेंडरच्या किंमतीत गेल्या 15 दिवसांत 100 रुपयांची वाढ झाली आहे, पण ग्राहकांच्या खात्यात केवळ 40.10 रुपयेच जमात होत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम असून तेल कंपन्यांचा अजब न्याय असल्याचे सांगत दाद कुणाकडे मागावी, अशी सवाल उपस्थित करीत आहेत.

याच विषयाला अनुसरून मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना आमदार भाई जगताप यांनी मोजक्या शब्दात म्हटलं आहे की, “सबसिडी आणि कर्जमाफी फक्त कॉपोर्टेस आणि मोदी सरकार च्या मित्रांना मिळणार…बाकी सर्वांनी आत्मनिर्भर व्हा..!!

 

News English Summary: Mumbai Congress state president Bhai Jagtap has slammed the Modi government. While tweeting in this regard, MLA Bhai Jagtap has said in a few words, “Subsidies and debt waivers will be given only to corporates and friends of Modi government … Let everyone else be self-reliant .. !!

News English Title: Mumbai Congress President Bhai Jagtap criticised Modi govt over farmers issues news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x