14 December 2024 6:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

अर्णब गोस्वामींनी मुंबई पोलिसांपासून वाचण्यासाठी दिल्लीमध्ये बस्तान हलविले - आ. भाई जगताप

Mumbai congress president Bhai Jagtap, Arnab Goswami

मुंबई, २४ जानेवारी: अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे.

काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी सांगितले की, अर्णब गोस्वामी हे मुंबई पोलिसांपासून वाचण्यासाठी दिल्लीमध्ये बस्तान हलविले आहे. जर मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला तर मुंबई पोलिसांवर त्यांना दिल्लीतून अटक करून आणण्यासाठी दबाव वाढेल. सोमवारपासून गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मी आणि कार्याध्यक्ष चरणजीत सिंह सप्रा सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहोत.

तत्पूर्वी हा देशद्रोहाचा प्रकार आहे असून गोस्वामीना तात्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. सचिन सावंत यांनी या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन संबंधित मागणी केली होती.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील अर्णब गोस्वामी विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने थेट आंदोलन करत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात राष्ट्रवादीने सांगितलं होतं की, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटसअप संभाषणातून देशातील अनेक संवेदनशील बाबी उघड झाल्या. हा देशद्रोहाचा प्रकार असून अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी विद्या चव्हाण आणि आणि प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.

 

News English Summary: Conversations with Arnab and Partho Dasgupta have revealed that the military action in Balakot as well as the terrorist attack in Pulwama were also discussed. The Congress has now taken a big decision as the central government has not taken any steps against it. Congress activists and leaders in Mumbai will file treason charges against Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, in all police stations in Mumbai. They will also demand Arnab’s arrest. Mumbai Congress president-elect and MLA Bhai Jagtap made the announcement at a meeting of Congress workers on Saturday.

News English Title: Congress Mumbai congress president Bhai Jagtap made serious allegations on Arnab Goswami news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x