7 May 2021 10:11 AM
अँप डाउनलोड

कराचीत फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा | सर्व घरंदारं सोडून पळतील | मग कराची आपलीच

Congress MLA Bhai Jagtap, Devendra Fadnavis, Amruta Fadnavis, Karachi topic

मुंबई, २५ नोव्हेंबर: ‘कराची स्वीट्स’ (Karachi Sweets) या दुकानाच्या नामांतराची एका शिवसैनिकानं केलेली मागणी चर्चेचा विषय ठरली होती. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोला हाणला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केलेल्या या मागणीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कराचीच एक दिवस भारतात असेल असं म्हटलं. त्यानंतर संजय राउत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. फडणवीसांवर टीका करताना राउत म्हणाले, “आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, कराचीच नंतर बघू”.

दरम्यान, याच विषयाला अनुसरण काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कोणाचेही नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची अप्रत्यक्ष खिल्ली उडवली आहे. फडणवीस म्हणाले होते ‘कराचीच एक दिवस भारतात असेल’….. यावर भाई जगताप यांनी ट्विट करत करत म्हटलं आहे की, ‘फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा…..कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील……मग कराची आपलीच!

 

News English Summary: Congress MLA Bhai Jagtap has indirectly ridiculed Devendra Fadnavis and Amrita Fadnavis without naming anyone. Fadnavis had said, “Karachi will one day be in India.” On this, Bhai Jagtap tweeted, ‘Just keep a song program, Karachi residents will run away from home, then Karachi is ours!

News English Title: Congress MLA Bhai Jagtap criticized Devendra Fadnavis and Amruta Fadnavis over Karachi topic news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x